पुण्यात तरुणीवर अत्याचार (फोटो- istockphoto)
पुणे: शिक्षणानिमित्त पुण्यात आल्यानंतर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीला पोलीस भरती करण्याचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २३ वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (आंबेगाव पोलीस ठाणे) तक्रार दिली आहे. त्यानूसार, राजू पंधारे (वय ४८, रा. भारती विद्यापीठ) गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा सैनिक कल्याण विभाग अशी संस्था चालविली जाते. या नोंदणीकृत संस्थेत राजू पंधारे हा क्लर्क म्हणून काम करत होता. याठिकाणी तरुणी पोलीस भरतीच्या तयारीसाठी जात होती. गेल्या चार वर्षापुर्वी त्यांची ओळख झाली होती. ओळखीनंतर राजू याने तरुणीला पोलीस दलात भरती करण्याचे आमिष दाखविले. पोलीस भरतीच्या आमिषाने तरुणीवर वेळोवेळी अत्याचार केला. पोलीस भरतीबाबत विचारणा केली असता तिला जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच, तिला मारहाण देखील केली. आरोपीच्या त्रासामुळे घाबरलेल्या तरुणीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रियांका गोरे तपास करत आहेत.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या युवकावर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत पीडित मुलीच्या ३५ वर्षीय आईने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, १८ वर्षीय तरुणावर गुन्हा नोंद केला आहे. आरोपी व पीडित मुलगी एकाच परिसरात राहण्यास आहेत. त्याने मुलीला धमकावून तिच्यावर नातेवाईकाच्या घरी नेहून बलात्कार केला. तिला धमकी देत मारहाण केली. घाबरलेल्या मुलीने याप्रकाराची माहिती तिच्या आईला दिली. सहायक निरीक्षक प्रियांका देवकर तपास करत आहेत.
गडचिरोलीत प्रेमसंबंधातून तरुणीवर वेळोवेळी अत्याचार
एका मुलीवर अत्याचार करण्याता आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीवर अत्याचार करून गर्भपात करणाऱ्या दोन आरोपींना अहेरी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. बावणकर यांनी मंगळवारी (दि. 3) पहिल्या आरोपीस सात वर्षे व दुसऱ्या आरोपीस 4 वर्षे सश्रम कारावास व दोन्ही आरोपींना 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
हेही वाचा: धक्कादायक ! प्रेमसंबंधातून तरुणीवर वेळोवेळी अत्याचार; गर्भवती होताच गर्भपातही केला अन् नंतर…
अनिल नानाजी ईजगामकर (34, रा. आलापल्ली), चंद्रकला सुरेश धानोरकर (47, रा. अनखोडा, ता. चामोर्शी) अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. अनिल ईजगामकर याने पीडित मुलीशी तीन वर्षापासून प्रेमसंबंध जुळवून लग्न करतो, असे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे पीडिता गर्भवती राहिली. तिचा गर्भपात करण्याकरिता आरोपीची मावशी चंद्रकला धानोरकर हिच्या मदतीने पीडितेला औषध पाजून गर्भपात केला. त्यामुळे पीडितेला रक्तस्राव होऊन ती गंभीर आजारी पडली. पीडिता ही अल्पवयीन व अनुसूचित जाती जमातीची असल्याचे आरोपीस माहिती असतानाही त्याने तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.