समुपदेशनाच्या नावाखाली मुलींचे लैंगिक शोषण (फोटो सौजन्य: Freepik)
गडचिरोली : एका मुलीवर अत्याचार करण्याता आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीवर अत्याचार करून गर्भपात करणाऱ्या दोन आरोपींना अहेरी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. बावणकर यांनी मंगळवारी (दि. 3) पहिल्या आरोपीस सात वर्षे व दुसऱ्या आरोपीस 4 वर्षे सश्रम कारावास व दोन्ही आरोपींना 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
हेदेखील वाचा : मुंबईत चाललंय तरी काय? एक वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, परळमधील धक्कादायक प्रकार
अनिल नानाजी ईजगामकर (34, रा. आलापल्ली), चंद्रकला सुरेश धानोरकर (47, रा. अनखोडा, ता. चामोर्शी) अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. अनिल ईजगामकर याने पीडित मुलीशी तीन वर्षापासून प्रेमसंबंध जुळवून लग्न करतो, असे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे पीडिता गर्भवती राहिली. तिचा गर्भपात करण्याकरिता आरोपीची मावशी चंद्रकला धानोरकर हिच्या मदतीने पीडितेला औषध पाजून गर्भपात केला. त्यामुळे पीडितेला रक्तस्राव होऊन ती गंभीर आजारी पडली. पीडिता ही अल्पवयीन व अनुसूचित जाती जमातीची असल्याचे आरोपीस माहिती असतानाही त्याने तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
याबाबतच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. तपासादरम्यान याप्रकरणातील पीडिता ही उपचारादरम्यान मृत पावली. त्यामुळे कलमात वाढ करण्यात आली. तपासात आरोपी विरुद्ध मृत्युपूर्व जबानी (बयाण) दिल्यामुळे तसेच सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
अतिरिक्त सत्र न्यायालयाने फिर्यादी व साक्षीदार तसेच वैद्यकीय अभिप्राय यांचे पुरावा व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश बावणकर यांनी मंगळवारी आरोपी ईजगामकर याला 7 वर्षे सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंड तसेच चंद्रकला धानोरकर हिला 4 वर्ष कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
अत्याचारांच्या घटनांमध्ये होतीये वाढ
राज्यात सर्वाधिक अत्याचाराचे गुन्हे मुंबईत दाखल असून, दुसऱ्या क्रमाकांवर ठाण्याचा क्रमांक लागतो. गेल्या चार महिन्यांत मुंबईत 226 अत्याचाराचे गुन्हे दाखल असूनस, ठाण्यात 118 तर पुण्यात 112 अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली आहे. ही धक्कादायक माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावरुन समोर आली आहे.
पोलिस निरीक्षकाकडून धमकी देऊन घाणेरडे कृत्य
दुसऱ्या एका घटनेत, पोलिस निरीक्षकाकडून विवाहित तरुणीला तुरुंगात पाठवण्याची धमकी देऊन घाणेरडे कृत्य केल्याचा आरोप आहे. त्याच्या मुलीच्या वयाच्या एका मुलीला घरी बोलावले, त्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिस निरीक्षकाने पीडितेसोबत घाणेरडे कृत्य करू लागला. पीडित महिला त्याला वारंवार नकार देत होती, पण इन्स्पेक्टर तिच्या नकाराला फेटाळून लावत होता. तो तिच्यावर जबरदस्ती करत राहिला. दरम्यान, संधीचा फायदा घेत पीडित मुलीने गुपचूप तिच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवला आणि इन्स्पेक्टरची घाणेरडी कृती कॅमेऱ्यात कैद झाल्याचाही प्रकार समोर आला आहे.
हेदेखील वाचा : विमानतळावर सामानात सापडला नवजात अर्भकाचा मृतदेह, प्लास्टिकच्या डब्यात केमिकल टाकून केलं पॅक; Video Viral