सौजन्य - नवराष्ट्र टीम
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील शेळकेवाडी येथील जयदिप यशवंत शेळके (वय ४२) याच्याकडून शेतात लावलेला १५ किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अवैध अंमली पदार्थांचा साठा, विक्री व शेती करीत असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. वरिष्ठांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तपास पथके तयार करून रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना पोलिस अंमलदार वैभव पाटील यांना माहिती मिळाली की, करवीर तालुक्यातील शेळकेवाडी ते वाशी रोडवरील विठ्ठलाई परिसरात असलेल्या ऊसाच्या शेतात एका व्यक्तिने गांजाच्या झाडाची लागवड केल्याची माहिती मिळाली होती.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव,पोलिस अंमलदार वैभव पाटील, अरविंद पाटील, महेंद्र कोरवी, परशुराम गुजरे, गजानन गुरव, अशोक पोवार, राजू येडगे, योगेश गोसावी, प्रदhप पाटील, विशाल खराडे, शिवानंद मठपती, अमित सर्जे, नामदेव यादव, महादेव कुराडे, यशवंत कुंभार, विशाल खराडे, संतोष बर्गे आणि अमोल कोळेकर यांनी ही कारवाई केली.
करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी आपल्या पोलिस पथकासह छापा टाकून जयदिप यशवंत शेळके याला ताब्यात घेतले. त्याच्या ऊसाच्या शेतात गांजाची काही झाडे आढळली. त्याच्याकडील एकूण १५ किलो वजनाचा ओला गांजा व इतर साहित्य असा एकूण एक लाख ५० हजार ५०० रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पुढ़ील तपासासाठी करवीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.