यवतमाळच्या पुसदमध्ये उधारीचे पैसे मागणाऱ्याला जबर मारहाण; चुलत्यालाही सोडलं नाही (File Photo : Crime)
अमरावती : हुंड्यासाठी आजही विवाहितांचे छळ सुरू असल्याचे जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात एकाच दिवशी दाखल झालेल्या तीन गुन्ह्यांवरून दिसून येत आहे. पैशांसाठी विवाहिता शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणात अमरावती शहरातील गाडगेनगर व वलगाव तर ग्रामीण भागातील येवदा पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळीविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला.
हेदेखील वाचा : जनता उपाशी अन् बेकायदेशीर धंदेवाले तुपाशी! महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने पुरंदरमध्ये भू-माफियांकडून उत्खनन
माहेरवरून पैसे आणण्याचा तगादा लावून एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. पीडित महिलेने या घटनेची तक्रार रविवारी (दि. 5) गाडगेनगर पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी सुरेश रामदास चंदन (30, रा. उमरा, अकोट) व एका महिलेविरुध्द गुन्हा नोंदविला आहे.
एक लाखाची मागणी करून मारहाण
व्यवसायासाठी 1 लाख रुपये आई- वडिलांकडून आण, असा तगादा लावून एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या घटनेची तक्रार पीडित महिलेने रविवारी (दि. 5) वलगाव पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार, पोलिसांनी आरोपी जितेश प्रतापराव गवई (वय 36), प्रतापराव नागारोव गवई, शेखर प्रतापराव गवई अंकीत गवई व दोन महिलांविरुध्द गुन्हा नोंदविला आहे.
हुंडा न दिल्याने साडेतीन लाखांची मागणी
लग्नात हुंडा दिला नाही. त्यामुळे एका विवाहितेला माहेरवरून 3 लाख 50 हजार रुपये आणण्याचा तगादा लावण्यात आला. या घटनेची तक्रार 35 वर्षीय महिलेने रविवारी (दि. 5) येवदा पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी भरत रामभाऊ पोतले (35), रामभाऊ पाडुरंग पोतले (वय 65) व एक महिला (तिन्ही रा. मोठी उमरी, जि. अकोला) यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविला आहे.
प्रेमाची तरुणाला मिळाली शिक्षा
दुसरीकडे, उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जिथे एका तरुणाला प्रेमात जीव गमावला. मुंबईहून घरी परतलेल्या तरुणाला प्रेयसीच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. त्यानंतर मृतदेह 500 मीटर दूर जंगलात नेऊन कोरड्या विहिरीत मृतदेह फेकून दिला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला. याप्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.