काय घडलं नेमकं?
ही घटना रविवारी सकाळी सुमारे दहा वाजता हिंजवाडी परिसरात जड वाहनांना प्रवेशबंदी होती. तरीही एका ट्रकने या परिसरात प्रवेश केला आणि या वेगाने धावणाऱ्या ट्रकने फुगे विकणार्या अल्पवयीन मुलाला जोरदार धडक दिली. या अपघातात मुलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर तेथून जाणाऱ्या आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने मुलाला आपल्या वाहनातून पिरंगुट येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार नाकारण्यात आले. त्यानंतर सूस परिसरातील रुग्णालयातही जागा उपलब्ध नसल्याने उपचार मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या.
Mumbai: मुंबईत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट! मालवणीतील चाळीला आग, 7 जण गंभीर जखमी
अखेर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मुलाला पुण्यातील संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले. आर्थिक अडचणीमुळे उपचारात विलंब होण्याची शक्यात असतांना फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज (FITE) या संघटनेने पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्याशी संपर्क साधला. डॉ. म्हसे यांनी तातडीने संचेती रुग्णालयाचे डॉ. पराग संचेती यांच्याशी चर्चा केली. परदेशात असतानाही डॉ. संचेती यांनी तत्काळ उपचारांचे निर्देश दिले. त्यानंतर मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्यावर उपचार सुरु आहे.
या घटनेची माहिती मिळताच हिंजवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संबंधित ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. जड वाहनांवर बंदी असतानाही आयटी पार्क परिसरात वाहन नेल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आयटी कर्मचारी आशुतोष पांडे, प्रशांत पंडित आणि पवनजीत माने यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मुलाचा जीव वाचला असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोल्हापुरात पाच लाखांच्या साड्या जप्त; ZP निवडणुकीत महिला मतदारांना आमिष?
Ans: पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्क परिसरात.
Ans: मुलावर संचेती रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून प्रकृती स्थिर आहे.
Ans: जड वाहन बंदी असतानाही परिसरात आलेल्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.






