पुणे: पुण्यातील राजाबहादूर मिल्स येथील “किकी” नावाच्या पबमध्ये शहरातील नामांकित कॉलेजच्या तरुण तरुणींची फ्रेशर्स पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत शेकडो अल्पवयीन मुलांना सरसकट मद्य विक्री सुरू होती. कुठलेही ओळखपत्र न पाहता तसेच एंट्रीचे रेकॉर्ड रजिस्टर न ठेवता अनेक कॉलेजमधील
१७-२१ वयोगटातील मुलांना ह्या पब चालकांनी प्रवेश दिला असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने थेट ही पार्टी बंद पाडली.
मनसेचा थेट इशारा
महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेने कार्यकर्त्यांसोबत राज्य उत्पादन शुल्क विभाचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते. इथून पुढे जर कुठल्याही पब रेस्टॉरंट्स ने जर फ्रेशर्स पार्टी आयोजित केली आणि अल्पवयीन मुलांना दारू पाजली तर त्या पबची एकही काच शिल्लक ठेवणार नाही, पूर्ण पब बार फोडून टाकण्यात येईल हा थेट इशारा महाराष्ट्र नवं निर्माण विध्यार्थी सेनेने कार्यकर्त्यांसोबत राज्य उत्पादन शुल्क विभाचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते. या घटनेमुळे पुणे शहरातील पब्समध्ये होत असलेल्या अवैध मद्य विक्रीच्या प्रकारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीने रोखली बंदूक, पोलिसांकडून गोळीबार
नांदेड शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नांदेड शहरातील पोलीस आणि आरोपीमध्ये रात्रीच्या सुमारास गोळीबार झाल्याचं समोर आलं आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस गेले असता तेव्हा गुन्हेगाराने चक्क पोलिसांवर रिवाल्वर रोखली. पोलिसांनी देखील त्याला प्रत्युत्तर देत गोळीबार केला. यात आरोपी पसार झाला आहे. नांदेड शहरातील कौठा भागात हा थरार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सुरज सिंह गाडीवाले हा नांदेड शहरातील कौठा परिसरात आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कौठा परिसरात पोहोचले. तेव्हा सराईत गुन्हेगार सुरज सिंघ गाडीवाले कारमधून आला. मात्र पोलीस आल्याची त्याला कुणकुण लागली आणि त्याने गाडी पळवली. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने पाठलाग केला तेव्हा आरोपी सूरज सिंघ गाडीवाले याने आपल्या जवळील गावठी पिस्टल काढली. त्याला उत्तर म्हणुन पोलिसांनी फायरिंग केली.
कुख्यात दहशतवादी सोबत संबंध असल्याचा संशय
दरम्यान, अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाला आहे. त्याची गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली असून सध्या आरोपीचा शोध सुरु आहे. आरोपी सुरज गाडीवाले हा रेकॉर्डवरचां गुन्हेगार आहे. त्याचे कुख्यात दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा सोबत संबंध असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे त्याला अटक करणं हे पोलिसांपुढेच आव्हान असणार आहे.