काय घडलं नेमकं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद पुण्यात एका ठिकाणी काम करत होता. त्यावेळी आरोपी संदीप भुरके याच्या नात्यातील एका तरुणीशी त्याची ओळख झाली होती. ओलक्खीचे रूपांतर पुढे प्रेमसंबंधात झाले. मात्र या प्रेमप्रकरणास आरोपी संदीप याचा विरोध होता. सोमवारी सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान जावेद आंबेगाव परिसरातील गायमुख परिसरात थांबला असतांना आरोपी संदीप आणि त्याच्या साथीदाराने त्याला गाठले.
त्याला तरुणीसोबतचे प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादातून आरोपी संदीप आणि त्याच्या मित्राने जावेदवार तीक्ष्ण शस्त्राने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत जावेदला तातडीने खासगीही रुग्णालयात दाखल कारण्यात आले. त्यानंतर त्याला ससून रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपी संदीप भुरके आणि त्याचा साथीदार फरार असून, त्यांना अटक करण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहे. याबाबत रौफ उस्मान शेख (वय ३५) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जावेद पठाण हा फिर्यादी रौफ शेख याचा भाऊ होता. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहे.
चोरांची नवी करामत! PMP बसमध्ये टोळी सक्रिय; पोलिसांकडून आठ दिवस गस्त अन् पुन्हा…
पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बससेवा ही पुणे शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. साधारणपणे दररोज दहा ते अकरा लाख प्रवासी पीएमपी बसने प्रवास करतात. मात्र, अलीकडील काळात पीएमपी बसमधील चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दररोज अशा घटना घडत असून, यामध्ये महिला प्रवाशांचे चेन,सोन्याच्या बांगड्या,प्रवाशांचे मोबाईल,पाकिटे आदी वस्तू चोरीला जात आहेत.तत्कालीन पीएमपी अध्यक्ष दिपा मुधोळ–मुडे यांनी या चोरांना आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात पत्र पाठवले होते. त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून एक पथक नेमून आठ दिवस गस्त घालण्यात आली. मात्र, त्यानंतर परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे वैसे’ झाली आहे.
Ans: प्रेमप्रकरणाच्या वादातून आणि संबंध तोडण्याच्या मुद्द्यावरून वाद वाढला.
Ans: सोमवारी सायंकाळी कात्रज येथील आंबेगाव परिसरात हल्ला झाला.
Ans: संदीप भुरके आणि त्याचा साथीदार फरार असून पोलिसांकडून शोध सुरू आहे.






