आता पर्यंत १२ लोकांच्या विकल्या किडनी
कृष्णाच्या माध्यमातून जवळपास १२ लोकांनी कंबोडियातील ‘प्रेआ केत मेलीआ हॉस्पिटल’ (मिलिटरी हॉस्पिटल), फ्नॉम पेन्हमध्ये आपल्या किडनी विकल्या आहेत.कृष्णा गरजूंना, गरिबांना आणि कर्जबाजारी लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या जाळ्यात अडकवत असे.
कृष्ण कसा बनला किडनी तस्कर?
आरोपी कृष्णा हा डॉक्टर नसून इंजिनिअर आहे. त्याचे खरे नाव रामकृष्ण मल्लेश सुंचू असे आहे. तो ओळख बदलून सोलापुरात राहत होता. कपड्यांच्या व्यवसायात मोठे नुकसान झाल्यानंतर तो गुन्हेगारी विश्वात वळला. सुरुवातीला त्याने स्वतःची किडनी विकली, नंतर त्याला याचे नेटवर्क मिळाले. याद्वारे तो लोकांना किडनी विकण्यासाठी आमिष दाखवू लागला. प्रत्येक किडनी व्यवहारामागे कृष्णाला 1 लाख रुपयांचे कमिशन मिळत होते.
पाच राज्यांत पसरलंय रॅकेट, आता सोलापूर कनेक्शनही उघड
भारतातील अनेक राज्यांमध्ये ही टोळी सक्रिय होती, उदाहरणार्थ पंजाब, हरियाणा, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि आता महाराष्ट्रातील चंद्रपूर, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्याशीही कनेक्शन उघड झालंय.
चंद्रपुरातील रोशन कुडेसोबत काय घडलं?
चंद्रपुरातील शेतकरी रोशन कुडे यांनी २०२१ मधून दोन सावकारांकडून त्याने ५० हजार रुपये घेतले होते. ज्याची वसुली रक्कम व्याजासह ७४ लाख रुपये इतकी झाली होती. त्यांनी डोक्यावरील कर्जाचे ओझं कमी करण्यासाठी किडनी विकण्याचा मार्ग स्वीकारला. फेसबुकच्या माध्यमातून कुडे हा आरोपी कृष्णाच्या संपर्कात आला. कृष्णाने त्यांना ८ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले. कोलकातामध्ये दोघांची पहिली भेट झाली, येथेच पहिली वैधकीय तपासणी करण्यात आली. यानंतर रोशनला कंबोडियामध्ये पाठवण्यात आलं आणि त्याची किडनी काढण्यात आली. याप्रकरणी ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला, यानंतर एकूण सहा सावकारांना अटक करण्यात आली.
कृष्णाला न्यायालयात केले अटक?
मंगळवारी (23 डिसेंबर) कृष्णाला सोलापुरातून अटक करण्यात आली. त्याला रात्री न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळेस त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी या आंतरराष्ट्रीय नेटवर्कमध्ये आणखी काही मोठे चेहरे समोर येऊ शकतात अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करता आहे.
Ans: कृष्णा उर्फ रामकृष्ण मल्लेश सुंचू, पेशाने इंजिनिअर.
Ans: कंबोडियातील प्रेआ केत मेलीआ (मिलिटरी) हॉस्पिटलमध्ये.
Ans: सोशल मीडियाच्या माध्यमातून गरिब, कर्जबाजारी लोकांना पैशांचे आमिष दाखवून.






