पुण्यातील नवले ब्रिजवर भीषण अपघात
अपघात झाल्यावर वाहनांनी घेतला पेट
काही काळासाठी वाहतूक झाली ठप्प
पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील नवले ब्रिजवर भीषण अपघात झाला आहे. नवले ब्रिजवर वाहनांचा अपघात झाला आहे. अपघात झाल्यावर या वाहनांनी पेट घेतला आहे. या भीषण अपघातामध्ये तीन ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत.
दरम्यान या घटनेत जखमी झालेल्या लोकांना जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत ३ ते ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पुण्यातील नवले ब्रिजवर सातत्याने अपघात झाल्याच्या घटना पाहायला मिळतात.
नवले ब्रिजवर ३ ते ४ गाड्यांची धडक झाल्याचे समजते आहे. दोन कंटेनरच्यामध्ये एक कार देखील जळत असल्याचे म्हटले जात आहे. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दल दाखल झाले आहे. घटना घडतंच या मार्गावरील वाहतूक काही कालावधीसाठी बंद ठेवण्यात आली. समोर आलेल्या माहितीनुसार ६ ते ७ लोकांचा मृत्यू झाला असून, २० ते २५ जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारा एक कंटेनरचे ब्रेक फेळ झाल्याने त्याने अनेक वाहनांना धडक दिल्याचे समजते आहे. दरम्यान हा कंटेनर पुढे जाऊन एका कंटेनरला धडकल्याचे समजते आहे. दोन्ही कंटेनरच्या मध्ये कार अडकली आणि तिचा चक्काचूर झाल्याचे समोर आले आहे. काही जण अजून गाड्यांमध्ये अडकून पडल्याचे समजते आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
विरुद्ध दिशेने कंटेनर आला अन् बाप-लेकाला उडवले
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ येथील फुलावर विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर गाडीने समोरील दुचाकी चालकाला उडवले. या भीषण अपघातात इंदापूर तालुक्यातील बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. खंडु नारायण बनसुडे (वय ३५)व रूद्र खंडु बनसुडे (वय दोघेही रा. पळसदेव ता. इंदापूर जि. पुणे) या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला. हा अपघात रविवारी ( दि. २)पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ हद्दीत चँनेल नं ७४+२०० चे ब्रिझ जवळ सायंकाळी पावणेसहा वाजता घडला.






