रायगड: रायगड येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. आधी इन्स्टाग्रामवर बनावट नावाने खाते उघडून प्रेमाच्या जाळ्यात टाकले. नंतर त्यालाला भेटायला बोलावून अपहरण केले आणि जंगलात नेऊन ओढणीने गळा आवळून त्याची हत्या केली. एवढेच नाही तर ओळख पटूनये म्हणून आरोपींनी त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर केमिकल टाकले आणि मोबाईल फोडून टाकला. हि हत्या आणि दुसरं तिसरं कोणी नाही तर त्याच्या पत्नीनेच आपल्या प्रियकर आणि मैत्रिणीसोबत मिळून केली.
Pune Crime: सत्र न्यायालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत व्यक्तीची आत्महत्या; चिठ्ठीत केसचा उल्लेख
ही घटना रायगड मधील नागोठणे येथे घडली. मृतकाचे नाव कृष्णा नामदेव खंडवी (वय २३, रा. गौळवाडी, पेण) असे आहे. आरोपी पत्नीचे नाव दिपाली अशोक निरगुडे (१९), तिच्या आरोपी प्रियकराचे नाव उमेश सदु महाकाळ (२१) तर आरोपी मैत्रिनेचे नाव सुप्रिया चौधरी (१९) असे आहे. १० ओक्टोम्बर रोजी कृष्णाला नागोठणे एसटी स्टँडवर बोलावून दोघांनी त्याचे अपहरण केले आणि वसगावच्या जंगलात नेऊन ओढणीने गळा आवळून त्याची हत्या केली. ओळख पटू नये म्हणून आरोपींनी त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर केमिकल टाकले आणि मोबाईल फोडून टाकला. पोलिसांनी या गुन्हयाचा उलगडा अवघ्या २४ तासांत उघडकीस आणत तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
कशी केली हत्या?
मिळालेल्या माहितीनुसार, तिघांनी संगनमत करून कृष्णा खंडवीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याची निर्दयपणे हत्या केली. त्यांनी इन्स्टाग्रामवर ‘पायल वारगुडे’ या नावाने बनावट खाते तयार केले आणि त्या खात्यामार्फत कृष्णाशी संपर्क साधला. १० ऑक्टोबर रोजी या खोट्या ‘पायल’च्या नावाने कृष्णाला नागोठणे एसटी स्टँडवर बोलावण्यात आले. कृष्णा ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर आरोपींनी त्याच्याशी गोड बोलत त्याला वासगावच्या जंगलात नेले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी आधी आखलेल्या योजनेप्रमाणे ओढणीने त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर ओळख पटू नये म्हणून कृष्णाच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर केमिकल टाकण्यात आले. एवढंच नव्हे, तर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी त्याचा मोबाईल फोनही फोडून टाकला.
सुरुवातीला पोलिसांना मिसिंग व्यक्ती असल्याने कोणताही पुरावा नव्हता. पोलिसांना हा व्यक्ती कोण आहे, कोणी केली हत्या? हे सर्व शोधन एक मोठं आवाहन होत. सुरुवातीला पोलिसांकडे ठोस पुरावा नव्हता. मात्र त्यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आणि सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आणि तांत्रिक पुरावे यांच्या आधारे संशयितांचा माग काढला. अखेर सखोल तपासानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून सखोल चौकशी सुरु आहे.
रायगड पोलिसांचं आवाहन
रायगड पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील अशा बनावट आयडीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही संशयास्पद माहिती किंवा व्यक्ती दिसल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. या तपासात दाखवलेल्या तत्परतेबद्दल नागोठणे पोलिस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Odisa Crime: दोन दिवसांच्या नवजात बाळाची विक्री! आईनेच केला ५० हजारात सौदा; चार मुलं झाली म्हणून…