मुंबई : मुंबई क्राईम ब्रांचमधील (Mumbai Crime Branch) वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला पॉर्नोग्राफी (Pornography) प्रकरणात गोवले होते, असा दावा बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती तथा उद्योजक राज कुंद्राने (Raj Kundra) सीबीआयला (CBI) केलेल्या तक्रारीत केला आहे. तसेच, कुंद्राने आपल्या तक्रारीत आपल्याविरुद्धचा हा संपूर्ण खटला एका व्यावसायिकाने त्याच्या वैयक्तिक सूडबुद्धीने रचला होता, असे म्हटले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा उद्योगपती राज कुंद्रा गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला होता. राज कुंद्राचे नाव पॉर्नोग्राफी प्रकरणात आल्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली होती. आता राज कुंद्राने पॉर्न प्रकरणातून सुटल्यानंतर एका वर्षानंतर आपले मौन सोडले आहे.
आपल्याविरुद्धचा हा संपूर्ण खटला हा एका प्रतिस्पर्धी व्यावसायिकाने वैयक्तिक सूडबुद्धीने तयार केला होता. यासाठी त्याने मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने आपल्याला कथित पॉर्नोग्राफी रॅकेटच्या खोट्या प्रकरणात अडकवले आणि अटक केली, असे कुंद्राने तक्रारीमध्ये म्हटले आहे.