उत्तरप्रदेश: लग्न जमल्यानंतर प्रत्येक जण आपल्या होणाऱ्या बायकोसोबत सुखी संसाराची स्वप्न पाहत असतो. आपले विचार जुळवण्याचा प्रयत्न करतो. आयुष्य कस असेल याचा विचार करतो. मात्र यूपीत अशी घटना घडली आहे. ती वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. आपल्या होणाऱ्या बायकोसोबत लग्ना आधीच त्याने बळजबरी केली आणि त्या नंतर लाखो रुपयांच्या हुंड्याची मागणी सुद्ध केल्याचे समोर आले आहे. होणाऱ्या बायकोला भेटायला बोलवलं आणि लग्नाला नकार दिला. मात्र हे करण्यापूर्वी त्याने तरुणीसोबत बळजबरी केल्याची घटना घडली आहे.
गतिमंद विद्यार्थ्याला शाळेत शिपायाकडून बेदम मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल
फ्लॅटवर नेवून केला घृणास्पद कृत्य
अंकूर चौहान अस या घटनेतील आरोपीचं नाव आहे. पीडितीच्या म्हण्यानुसर दोघांच्या घरच्यांनी संमतीने लग्न ठरवलं होत आणि जवळपास ६० लाख रुपये हुंडा ही ठरवला होता. त्याने तरुणीला मॉल मध्ये भेटायला बोलावल आणि त्या नंतर तो तिला फ्लैट मध्ये घेवून गेला. मी तुझ्या सोबत लग्न करणार आहे अस सांगत तिच्यावर घृणास्पद कृत्य करण्याचा प्रकार केला. या सगळ्या नंतर त्याने कुटुंबाला ही गोष्ट कळू दिली नाही. या सगळ्यानंगर तिने गाझियाबाद पोलिसात तक्रार दिल्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक कोटीची मागणी ! सासऱ्याने गाडी ही बुक केली होती
अंकुर चौहान यांच्यासाठी मुलीच्या घरच्याने लग्न ठरवत असताना हुंडा तर दिलाच मात्र लग्नात एक महागडी गाडी ही मुलीच्या घरचे त्याला देणार होते. लग्न होण्या आधीच त्याने एक कोटीचा हुंडा मागितला आणि तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करत नाहीत म्हणून लग्नाला नकार दिला. त्या नंतर तरुणीने तिच्या घरच्या लोकांना याने केलेल्या दुष्कृत्याची कल्पना दिली. पोलिसात पीडितेने तक्रार दिल्यावर त्याच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीच्या लग्नाआधी हा विचार करा
मुलगी चांगल्या घरी जाव म्हणून तिला जास्तीचा हुंडा दिला जातो . मात्र आज काल लग्न करत असताना मुलगा कसा आहे? त्याच चारित्र्य काय हे ही तपासणे गरजेच आहे. उत्तर प्रदेशातल्या या घटनेने हा समाजाचा चेहरा समोर आला आहे. अजूनही लोकांमध्ये हुंडा बंदीचा कायदा होवून ती मानसिकता जायला तयार नाही आहे.






