पुणे: पुण्यातून एक भोंदू बाबाचा कारनामा सामोर आला आहे. आयटी इंजिनीयरची कोट्यवधी रुपयांची फसवणूक एका भोंदू बाबाने केल्याचे समोर आले आहे. शंकर महाराज अंगात येतात आणि ते दुर्धर आजार बरे करतील असे म्हणत फसवणूक केल्याचे समोर आले आहे. दीपक डोळस असे फसवणूक झालेल्या आयटी इंजीनियर यांचे नाव आहे. त्यांनी भोंदू बाबाच्या जाळ्यात अडकून इंग्लंडमधील घर देखील विकल्याचे समोर आले आहे. या भोंदू बाबाच नाव दीपक खडके असे आहे. त्याला वेदिका पंढरपुरकर या त्याच्या शिष्येने फसवणूक करण्यात मदत केली आहे.
नेमकं काय घडलं?
दिपक डोळस, त्यांची पत्नी दोन मुलींना राजेंद्र खडकेच्या दरबारात नेण्यात आले. तिथे वेदिका पंढरपुरकर हीने तीच्या अंगात शंकर महाराज येतात अशी अॅक्टींग केली. त्यानंतर तुमच्याकडे संपत्ती ठेवल्यास तुम्हाला येतील असे सांगून बॅंकेतील सर्व पैसे आणि ठेवी वेदिका यांच्या खात्यात वळत्या करायला लावल्या. हे सर्व पैसे आरटीजीएसने राजेंद्र खडके आणि वेदिका पंढरपुरकर यांनी त्यांच्या बॅंक खात्यांवर वळते करुन घेतले.२०१८ पासून फसवणुकीचा प्रकार सुरु होता.
इंग्लंडमधील घर, फार्म हाऊस
दीपक डोळस यांनी बँकेतील सर्व पैसे वळवल्यानंतर देखील डोळस यत्तांच्या दोन्ही मुली बऱ्या झाल्या नाहीत. त्यांनतर खडके आणि पंढरपूरकर यांच्याकडे विचारणा केली तेव्हा त्यांनी तुमच्या घरात दोष आहेत असे सांगितलं. डोळस हे काही वर्ष इंग्लंडमध्ये नोकरी करत होते. त्यामुळे त्यांचं इंग्लंडमध्ये देखील घर होतं. फार्महाउस खरेदी केले होते. ते इंग्लंडमधील घर आणि फार्म हाऊस त्यांना विकायला लावलं. आणि ते पैसे पंढरपूरकर यांच्या खात्या वळवण्यात आले. त्यानंतर डोळस यांना त्यांचा पुण्यातील प्लॉट आणि फ्लॅट विकण्यास सांगण्यात आलं आणि ते पैसे देखील हडप करण्यात आले.
लोन काढण्यास सांगितले
आता तरी आपल्या दोन लहान मुली बऱ्या होतील याची अपेक्षा डोळस करत होते. मात्र मुली बऱ्या होत नाहीत असं त्यांच्या लक्षात आला. त्यांनी पुन्हा खडके आणि वेदिका पंढरपुरकर यांच्याकडे विचारणा केली तेव्हा त्यांनी त्यांच्या राहत्या घरात दोष असल्याचे सांगितले. मात्र आता राहण्यासाठी एकमेव घर उरले असल्याचं डोळस यांनी सांगितले आणि घर विकण्यास असमर्थता दर्शवली. तेव्हा डोळस यांना ते घर तारण ठेऊन घरावर लोन काढण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर पर्सनल लोन देखील काढण्यास सांगण्यात आलं. हा सगळा पैसा राजेंद्र खडके आणि वेदिका पंढरपुरकर यांनी हडप केला आणि त्या पैशातून कोथरुड येथील महात्मा सोसायटीत आलीशान बंगला खरेदी केला आहे.






