दोन मुलांसह वडिलाची आत्महत्या; चांदवड तालुक्यातील धक्कादायक घटना (File Photo : Suicide)
बल्लारपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या एका पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि.15) उघडकीस आली. अजय पांडुरंग मोहूर्ले (वय 40) असे मृत पोलिस शिपाईचे नाव आहे.
बल्लारपूर पोलिस स्टेशन येथे कार्यरत पोलिस अजय पांडुरंग मोहुर्ले हे वस्ती विभागातील क्वार्टरमध्ये राहत होते. त्यांचा पत्नीसोबत वाद होत होता. मागील पाच सहा दिवसांपासून त्यांची पत्नी नातेवाईकाकडे गेली असता त्यांनी राहत्या क्वार्टरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
सोमवारी त्यांचे मामा हरीचंद्र बालाजी निकुरे (रा. चंद्रपूर) हे अजय ला भेटण्यासाठी आले असता त्यांना दार आतून बंद दिसले. कानोसा घेतला असता त्यांना दुर्गंध आल्याने त्यांनी लगेच आजूबाजूच्या क्वाटरचा लोकांना सांगितले. तसेच पोलिस स्टेशनला याबाबत माहिती दिली. अजय यांनी आत्महत्या दोन दिवसापूर्वी केली असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, पंचनामा करून शवविच्छेदनकरिता ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक साखरे, पोलिस निरीक्षक आसिफराजा बी. शेख यांनी भेट दिली.






