नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पोलीस शिपायाने स्वतःच्या सहा वर्षाच्या मुलीला गळफास लावून संपवलं. त्यानंतर त्याने स्वतःही गळफास लावून आत्महत्या केली. मृतकाचे नाव स्वप्नील गायकवाड असे त्या मृतपोलीस शिपायाचे नाव असून भैरवी असं सात वर्षाच्या मुलीचे नाव आहे. घटस्फोटानंतर पोलीस शिपाई मानसिक तणावानंतर हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात उघड झालं आहे.
स्वप्नील गायकवाड हा नाशिक शहर पोलीस दलात कार्यरत होता. त्याच्या पत्नीसोबत घटस्फोट झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावाखाली होता. त्यामुळेच त्याने स्वतःच्या सहा वर्षाच्या मुलीला आधी गळफास लावली त्यानंतर त्याने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली असून या प्रकरणी स्वप्निलच्या घटस्फोटित पत्नीकडून माहिती घेतली जाणार असल्याचं पोलीस उपयुक्त मोनिका राऊत यांनी सांगितलं. यामागे नेमकं काय कारण आहे याचाही तपास सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
आरोपीचा मित्र असल्यानेच झाली अटक; ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात नाव आलं अन्…
वडगावमध्ये भरदिवसा घरफोडी; ११ लाखांचा ऐवज लांबविला, पोलिसांत गुन्हा दाखल
पुणे: वडगाव बुद्रुक परिसरात चोरट्यांनी भरदिवसा बंद फ्लॅट फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा ११ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी दीपाली प्रसाद गुरव (वय ३४, रा. ,सद्गुरुकृपा बिल्डींग, रेणुकानगरी, वडगाव बुद्रुक) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनुसार, चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गुरव यांचे वडील आजारी आहेत. त्यांना डेक्कन जिमखाना भागातील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. सोमवारी (२३ जून) सकाळी साडेदहाच्या सुमारास त्या फ्लॅट बंद करुन रुग्णालयात गेल्या होत्या. रुग्णालयातून त्या सायंकाळी सहाच्या सुमारास घरी आल्या. तेव्हा फ्लॅटचे कुलूप तोडल्याचे लक्षात आले. चोरट्यानी शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने आणि रोकड असा ११ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याचे उघडकीस आले. त्यानंतर गुरव यांनी रात्री पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत.
शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. सातत्याने विविध भागात फिरून चोरटे बंद फ्लॅट फोडत लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेत असल्याचे दिसत आहे. पोलिसांकडून चोरट्यांचा माग काढला जात आहे. परंतु, या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे दिसत आहे. शहर तसेच उपनगरातील सोसायट्यातील बंद फ्लॅट टार्गेट केले जात आहेत. सुरक्षा रक्षक नसलेल्या तसेच सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणी घरफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निरीक्षण आहे.
पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तरुणाला ठोकल्या बेड्या; पोलिसांनी सापळा रचून पकडले