घरी परतणाऱ्या भावंडावर काळाचा घाला (फोटो सौजन्य: social media)
बीड जिल्ह्यातील पाटोद्याजवळ एका भीषण अपघात झाला. या अपघातात वडील आणि मुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे. दरम्यान, दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. बीडच्या पाटोदा शहराजवळ पुण्याहून केजकडे जाणारी भरधाव वेगातील कार पुलाच्या कठड्याला धडकून ट्रॅव्हल्सवर जाऊन आदळली. या अपघातात अश्फाक शेख (40 वर्षे) आणि त्यांचा मुलगा अल्ताफ शेख (15 वर्षे) हे दोघेही जागीच ठार झाले आहेत. पुण्यावरून हे दोघेही आपल्या गावी म्हणजेच केजकडे येत होते. मात्र, पाटोदाजवळ आले असता त्यांच्या कारचा अपघात झाला
रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याचे वाटले होते, परंतु सत्य काही वेगळच .
चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ती कार पुलाच्या कठड्याला धडकली. त्यानंतर तीन पलट्या खाऊन समोरून येणाऱ्या एका खासगी कंपनीच्या ट्रॅव्हल्सवर जाऊन आदळली. त्यात कारमधील दोघांचाही मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पाटोदा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत कारमधून मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर, मृतदेह पाटोदा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
राज्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढल्याचे पाहायला मिळत असून केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी देखील याबाबत चिंता व्यक्त केली होती. वर्तमानपत्रात किंवा माध्यमांमध्ये सातत्याने अपघाताच्या बातम्या येत असून महामार्गावरच हे अपघात घडत असल्याचे दिसून येत आहे.
साताऱ्यात ड्रग्ज इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश
सातारा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सातारा शहरांमध्ये नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रग्ज इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणांमध्ये एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पाच लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिवराज पंकज कणसे (वय २४, रा. हिलटॉप सोसायटी, शाहूनगर, गोडोली), साईकुमार महादेव बनसोडे (वय २५, रा. भोसे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर), सुदीप संजय इंगळे (वय १९, राहणार कोयना सोसायटी सदरबाजार सातारा), अतुल विलास ठोंबरे (वय २०, रा. झेडपी कॉलनी, शाहूपुरी, सातारा), तयब हाफिस खान (वय २३, रा. बांगुर नगर, गोरेगाव, मुंबई) या ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
साताऱ्यात ड्रग्ज इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; पाच आरोपींना ठोकल्या बेड्या