बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका पोलीस कर्मचाऱ्यानेच १० लाख रुपयांसाठी पत्नीचा छळ केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांसह चार जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
नांदेडमध्ये चोर समजून २४ वर्षीय युवकाची हत्या; ‘नेटग्रीड’मुळे ओळख पटली; चार आरोपींना अटक
रेणुका विनोद कुटे असे तक्रार दाराचे नाव आहे. त्यांचे पती विनोद कुटे बीड जिल्हा पोलीस दलात कार्यरत असून सध्या ते पोलीस मुख्यालयात पदस्थापनेवर आहेत. २०२१ पासून रेणुका यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असल्याची तक्रार देण्यात आली आहे. चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरून १० लाख रुपये घेऊन ये असं म्हणत रेणुका यांचा छळ मागील काही वर्षांपासून केला जात आहे. शिवीगाळ करुन मारहाण केली त्याचबरोबर धमकी देखील दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
पोलिसांनी विनोद कुटे, सीता कुटे, रोहिणी गाडे आणि गोविंद गाडे या चार जणांविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून पोलिसानेच छळ केळ्याने आता खळबळ उडाली आहे.
बीड हादरलं! सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतांना आणखी एक बीडमध्ये एक अशीच घटना घडली आहे. बीडच्या एका विवाहितेने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे. तिने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव प्रियांका खाकाळ आहे. तिने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विषारी औषधाचा सेवन करून आत्महत्या केली. 13 वर्षांपूर्वी प्रियंका यांचा विवाह बापू खाकाळ याच्याशी झाला होता. मात्र अशात नवीन घर बांधण्यासाठी माहेराहून पैसे घेऊन ये, अशी मागणी करत सतत जाच केला जात होता. याच जाचाला कंटाळून प्रियंका यांनी विषारी द्रव्य प्राशन करत आपलं जीवन संपवलं आहे. दरम्यान या प्रकरणात सासरा, सासू, दीर, जाऊ या चार जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा राज्यात अशाच घटना घडत आहेत. अशा घटनांमध्ये दोषी असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.
धक्कादायक ! एकाच स्कार्फने गळफास घेऊन तरुण-तरुणीची आत्महत्या; सोलापुरात खळबळ