सौजन्य - सोशल मिडीया
सांगली : कोल्हापूर येथील एका विवाहितेने सांगलीतील तरुणाशी दुसरे लग्न केले. त्यासाठी स्वत:चे नावही बदलले. खोटे लग्न करून पतीला दीड लाखाचा गंडा घातला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांची टोळी जेरबंद केली आहे. पल्लवी मंदार कदम (मूळ नाव : परवीन मोदीन मुजावर. रा. रेल्वे स्टेशन झोपडपट्टी, गांधीनगर, कोल्हापूर), एजंट राणी ऊर्फ रत्नाबाई सुभाष कुंभार (रा. पंचशीलनगर), राधिका रतन लोंढे (रा. लोंढे कॉलनी, न्यू इंग्लिश स्कूलजवळ, मिरज), सुमन दयानंद वाघमारे (रा. वैरण बाजारजवळ, मिरज) अशी संशयितांची नावे आहेत. ९ सप्टेंबर २०२४ ते ८ डिसेंबर २०२४ या कालावधीत ही घटना घडली.
फिर्यादी तरुण खासगी नोकरी करतो. संशयित चार महिलांसह नाईकबाई नावाच्या आणखी एका महिलेने संगनमत करून पल्लवी कदम ऊर्फ परवीन मुजावर हिचे पहिले लग्न झालेले असतानाही या तरुणाशी दुसरे लग्न लावून दिले. याकरिता तरुणाकडून दीड लाख रुपये घेतले. ते संशयितांनी वाटून घेतले. पल्लवीचा पती मंदार जिवंत असताना तसेच तिचा धर्मही संशयितांनी लपवून ठेवला. काही दिवसांनी तरुणाला या टोळीच्या कारनाम्याची माहिती मिळाली. त्याने संजयनगर पोलिस ठाण्यात टोळीविरोधात तक्रार दाखल केली.
हे सुद्धा वाचा : पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; सणस ग्राऊंडजवळ महिलेची सोनसाखळी हिसकावली
आणखी एका टोळीचा पर्दाफाश
खोटे लग्न करणाऱ्या आणखी एका टोळीचा छडा संजयनगर पोलिसांनी लावला आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील एका तरुणाने याबाबत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी काजल सागर पाटील (मूळ नाव करिष्मा हसन सय्यद, रा. रेल्वे स्टेशन झोपडपट्टी, गांधीनगर, कोल्हापूर), एजंट सारिका दीपक सुळे (रा. आरवाडे पार्क, म्हसोबा मंदिरसमोर सांगली), अजित आप्पा खरात (रा. पाटील गल्ली, वानलेसवाडी, सांगली), कमल अनिल जाधव (रा. अहिल्यानगर, सांगली) या चौघांना अटक केली. या संशयितांना पाटोदा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.
पुण्यात फसवणूकीचे प्रमाण वाढले
पुण्यात फसवणूकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली व्यवसायासाठी चार कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची ७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी तन्मय रमेश जाधव (रा. ओैंदुबर दर्शन सोसायटी, फातिमानगर, वानवडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात ६१ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक आहेत. त्यांची एका परिचितामार्फत तन्मय जाधवशी ओळख झाली होती.