नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन (फोटो सौजन्य- PINTEREST)
मध्यप्रदेश मध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. वहिनीने दिराच्या कृतीला कंटाळून टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं. तिने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या पतीच्या पायाजवळ एक मेसेज सोडला. या चिठ्ठीत तिने दिराच्या दुष्कृत्यांबद्दल लिहून ठेवला होता. ही घटना मध्यप्रदेशातील मौगंज येथे घडली आहे. नेमकं प्रकरण काय आहे? चिठ्ठीत नेमकं काय? जाणून घेऊयात.
पुण्यात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; मोठं रॅकेट उद्ध्वस्त
आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव मंजू साकेत (वय वर्ष २७) असं आहे. हे प्रकरण नायगढी पोलिस स्टेशन परिसरातील वॉर्ड-8 मध्ये घडली आहे. मंजूने पतीच्या पायावर सुसाईड नोट लिहून ठेवली आणि आत्महत्या केली. घरातल्या खोलीत फासावर अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. घटनेच्या वेळी, कुटुंबातील इतर सदस्य गोठ्यात पीक मळणी करत होते. तिचा दीर आणि भाची घरी परतले तेव्हा मृतदेह फासावर लटकलेला पाहून त्यांना धक्का बसला.
याबाबत पोलिसांना लगेच कळवण्यात आले असता पोलिसांनी पंचनामा प्रक्रिया पूर्ण केला. मंजुचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सामुदायिक आरोग्य केंद्रात पाठवला आहे. पोलिसांनी सांगितले की, मृत महिलेच्या पायाजवळ एक सुसाईड नोट लिहिलेली आढळली. त्यात मंजूने तिचा दिरावर गंभीर आरोप केले आहेत. दीराचं नाव अंकुश असे आहे. अंकुश माझ्याकडे वाईट नजरेने पाहतो, मी त्याला विरोध केला तर मला धमकी देतो, असा आरोप मृत महिलेने केला आहे.
चिठ्ठीत नेमकं काय?
मृत महिलेने तिच्या पतीच्या नावाने ही सुसाईड नोट लिहिली होती. “माझी आई हे जग सोडून गेल्यापासून मी तुम्हाला माझे आई आणि वडील मानत आहे. तूही माझ्यावर खूप प्रेम करतोस. पण तुझा भाऊ अंकुश खूप घाणेरडा आहे. तो घाणेरड्या नजरेने माझ्याकडे पाहतो. मी त्याला असं करण्यापासून रोखलं तेव्हा तो भांडायचा. मी खूप वेळा विचार केला की तुम्हाला सगळं सांगावं, पण मी तुमच्यासमोर काहीच सांगू शकले नाही. मला भीती वाटत होती की तुम्ही काहीतरी कराल. मी तर हे जग सोडून जात आहे पण अंकुशला सोडू नकोस. तो गलिच्छ आहे. ” अशा शब्दांत मृत महिलेने तिच्या दीरावर गंभीर आरोप केले.
महिलेच्या भावाने केले गंभीर आरोप
मृत महिला मंजूच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणाही आढळून आल्या. त्यानंतर तिचा भाऊ गोविंद याने अनेक आरोप केले आहेत. माझ्या बहिणीची हत्या करून तिला फाशी देण्यात आली. त्याने मंजूच्या सासू, सासरे आणि मेहुण्यांवर गंभीर आरोप केले आहेत आणि निष्पक्ष चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे. हे प्रकरण संशयास्पद असल्याने पोलिसांनी त्याचा गांभीर्याने तपास सुरू केला आहे. मृत मंजूच्या पतीचीही चौकशी सुरू आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर पतीला धक्का बसला आहे. सतत रडण्यामुळे त्याची तब्येत गंभीर झाली आहे.
धक्कादायक! विधीसंघर्षित बालकाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या; नाशिक हादरलं