अलीगडमध्ये विद्यार्थिनीवर हल्ला (फोटो -istockphoto)
अलीगढ: उत्तर प्रदेशच्या अलीगडमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अलीगडमधील प्रसिद्ध असणारे टीआर डिग्री कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर गंभीर हल्ला झाला आहे. ही विद्यार्थिनी बीएससीच्या तृतीय वर्षात शिकत होती. कॉलेजमध्ये ही विद्यार्थिनी जखमी अवस्थेत आढळून आली. तिच्या शरीरावर असंख्य जखमा आणि चाकूने वार केलेले निशाण होते. तिला त्याच अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने शुद्धीवर आल्यावर तिच्यावर हल्ला झाल्याचे तिने सांगितले.
नेमके प्रकरण काय?
अलिगडमधील एका कॉलेजमध्ये एका तृतीय वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. तिने रूग्णालयात शुद्धीवर आल्यावर माझ्यावर हल्ला झाल्याचे सांगितले. माझ्यावर हल्ला झाला. दोन लोक मला मारू इच्छित होते. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा माझा हाताला जखमी होती आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु होता. तिच्या सांगण्यानुसार, हल्ला करणारे दोघे जण होते.
जखमी झालेली विद्यार्थिनी एनसीसीची विद्यार्थीं आहे. विद्यार्थिनीच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, त्याने सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बहिणीस कॉलेजला सोडले होते. त्यानंतर त्यांना काही वेळाने बहीण गंभीरपणे जखमी असल्याची माहिती मिळाली,. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला नसून, तिच्यावर हल्ला झाला आहे. कॉलेजमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने नेमके काय घडले हे समोर येऊ शकलेले नाही.
Pune News : लग्नाच्या आमिषाने फसवणूक केल्याच्या तक्रारीवरुन न्यायालयाचा मोठा निर्णय; आरोपीला…
विद्यार्थिनीचा परिवार आक्रमक
कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर हल्ला झाल्याचे समजताच तिचे कुटुंब आक्रमक झाले आहेत. ते घटना कळतच कॉलेजमध्ये पोहोचले. त्यांनी प्राचार्यांच्या केबिनला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळेस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी कॉलेज प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. कॉलेजमध्ये सुरक्षा व्यवस्था चोख असताना बाहेरून कोणी येऊन कसा काय हल्ला करू शकते असा प्रश्न उपस्थिती करण्यात येत आहे.
घटनेचा तपास कसा होणार?
अलिगडमधील एका कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. मात्र कॉलेजमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने पोलीस प्रशासनासमोर तपास कसा करायचा हा प्रश्न उभा राहिला आहे. पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहे. मात्र अनेक कॅमेरे बंद असल्याने त्यात अडचणी येत आहेत. दरम्यान कॉलेजमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने पोलीस प्रशासन कॉलेजवर देखील कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.