चिमुकलीवर अत्याचार; आरोपीला 20 वर्षांची शिक्षा (संग्रहित फोटो)
पुणे : लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध निर्माण करणे तसेच आर्थिक पैसे घेऊन फसवणूक केल्याच्या आरोपावरून दाखल गुन्ह्यात आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला आहे. नऊ वर्षांपासून असलेले संबंध व नंतर आरोपीने दुसऱ्या मुलीशी विवाह केल्यावरून ही तक्रार देण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
गोविंद पाराजी होगे (वय ३१) असे जामीन मंजूर केलेल्याचे नाव आहे. सिंहगड रोड पोलिसांत गोविंद होगेवर भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ६९ अंतर्गत गुन्हा नोंद केला होता. याबाबत ३९ वर्षीय पिडीत महिलेने तक्रार दिली आहे. दाखल गुन्ह्यात पोलिसांनी गोविंद होगे याला गुन्ह्यात अटक केली होती. नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती.
दरम्यान, होगे याच्या वतीने वकील मोनाली शेळके यांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयात शेळके यांनी दोघांचे नऊ वर्षांपासून सहमतीने संबंध होते. परंतु, नंतर होगे याने दुसऱ्या मुलीशी विवाह केल्यावरून ही तक्रार देण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा दाखला यावेळी युक्तीवाद करताना शेळके यांनी दिला. दोन्ही बाजूचा युक्तीवादानंतर न्यायालयाने होगे याला अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला.
तरुणीला जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलले
एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बांगलादेशमधून कामाच्या निमित्ताने भारतात आणलेल्या एका अल्पवयीन मुलीला पुण्यातील बुधावर पेठेत जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिला ब्युटी पार्लरमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. मात्र, नंतर दलाल व्यक्तींनी तिला बुधवार पेठेतील कुंटणखान्यात ठेवले. तसेच, वेश्याव्यवसायासाठी जबरदस्तीही केली. नकार दिल्यानंतर या तरुणीला पट्ट्याने मारहाण करण्यात आली. एका सामाजिक संस्थेने हा प्रकार समोर आणत पोलिसांच्या मदतीने तरुणीची सुटका केली आहे. याप्रकरणी अभिषेक प्रकाश संथेबेन्नूर (वय २२, कर्नाटक) व तमन्ना मुख्तार शेख (रा. बांगलादेश) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर रकीब खान फरार असून, याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (पीटा), बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण प्रतिबंध कायदा (पोक्सो), पारपत्र अधिनियमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.