चंद्रपूर: मुलाला तलाठी पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत चंद्रपूर जिल्ह्यात एका तालुका क्रीडा अधिकाऱ्याची तब्बल २८ लाखांनी फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष बाब म्हणजे फसवणूक करणारा आरोपी हा त्याच कार्यालयातील एक कंत्राटी कर्मचारी आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नाव प्रशांत आक्केवार असे असून तो सध्या फरार आहे. तर त्याचा साथीदार राजू पुद्दतवार याला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या फसवणुकीच्या घटनेने एकाच खळबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून फरार प्रशांत आक्केवार याचा शोध घेत आहे.
भांडणं सोडवण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग; अंगावरची कपडे फाडत…
पुढे आलेल्या माहितीनुसार, मूल तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठीकरे यांच्या मुलाला तलाठी पदावर नोकरी लावण्याचं आश्वासन देत अमिश दाखवून या आरोपींनी २८ लाखांची फसवणूक केली. परंतु फसवणूक झाल्याचे समजताच ठिकरे यांनी मुल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यांनतर दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला असून या दोन आरोपींनी मुलं नगर परिषदेस इतर अनेक ठिकाणी नोकरीच आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केले आहे. पोलिसांनी अश्या प्रकारची फसवणूक झाल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
पवनचक्की वाद चिघळला: शेतकऱ्यांवर आणि नगरसेवकावर पोलिसांचा अमानुष लाठीचार्ज
Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात पवनचक्की वादातून एका शेतकऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. तांदुळवाडी येथील पववचक्की विद्युत लाईन टॉवरचा मावेजा (जमीनीचा वाढीव मोबदला) देऊन काम करा अन्यथा काम थांबवा, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली होती. पण काम थांबवा असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांवरच पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्याया लाठीचार्जमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकालाही अमानुष लाठीमार करण्यात आला आहे. पोलिसांच्याया मारहाणची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर संभाव्य धोका टाळण्यासाठी लाठीचार्ज करावा लागल्याचे स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आले आहे.
मुंबई हादरली! कॅब चालकाने रस्ता बदलला, महिला वैमानिकाला कॅबमध्ये अडकवले आणि….