काय नेमकं प्रकार?
कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. ही घटना मंडावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजपूर नवादा गावातील आहे. येथे जयपाल सिंह हे सार्वजनिक बांधकाम विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे दोन मुलं, अरुण व हिमांशू, कुटुंबासह राहतात. हिमांशू याला दारूचा व्यसन आहे. तो नेहमी घरात वाद- विवाद करायचा. घटनेच्या दिवशीही तो मद्यप्राशन करून आला आणि नेहमीप्रमाणे भाऊ अरुण व वाहिनी मंजू यांच्यावर शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाहिनीने विरोध केला तेव्हा संतापला. याच रागात हिमांशू थेट घराच्या दुसऱ्या मजल्यावर गेला. तिथे खेळात असलेल्या तीन वर्षांच्या मानवीचा धारदार वस्तूने गळा चिरून हत्या केली. त्यानंतर पाच वर्षांच्या मयंकला उचलून दुसऱ्या मजल्यावर गेला आणि तिथून फेकून दिले.
मयंक यात गंभीर जखमी झाला. मायकच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच त्याची आई आणि वडील धावत गेले. त्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेनंतर हिमांशू घरातून फरार झाला. कुटुंबीयांनी त्याच्याविरुद्ध हत्या व हत्येचा प्रयत्न याचा गुन्हा नोंदवला आहे.
स्थानिकांनी काय दिली माहिती?
हिमांशूला वाटत होते की त्याच्या दारूच्या व्यसनामुळे वडील त्यांची जमीन मोठा मुलगा अरुणच्या नावावर करतील. त्यामुळे तो अनेक महिन्यांपासून जमीन स्वतःच्या नावावर करण्याचा हट्ट धरून होता. याच कारणातून तो सतत घरात भांडण करत होता अशी माहिती स्थानिकांनी दिली.
आरोपीला अटक
प्राथमिक तपासात हा प्रकार जमिनीच्या कौटुंबिक वादातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी फरार आरोपी हिमांशूला अटक केली असून कारवाई सुरु केली आहे.
Kankavli Crime: कणकवलीत प्रेमीयुगलाची धरणात उडी घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारण उघड, नेमकं काय घडलं?
Ans: उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील राजपूर नवादा गावात.
Ans: जमिनीचा वाद आणि दारूच्या व्यसनातून निर्माण झालेला कौटुंबिक संघर्ष.
Ans: खून व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.






