काय आहे नेमकं प्रकरण?
घडलेली घटना मुजफ्फरपूर जिल्ह्यातील कांटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २३ जुलै रोजी घडली. विकास पासवान याने मंजू देवी यांना बागेत बोलावले होते. तिथे दोघांमध्ये त्यांच्या संबंधावरून वाद झाला. त्यानंतर आरोपीने मंजू देवी यांची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यावेळी त्यांचा सहा वर्षांचा मुलगा आर्यनही घटनास्थळी उपस्थित होता. या घटनेचे सत्य बाहेर येईल या भीतीने आरोपीने आर्यनचीही हत्या केल्याचा पोलिसांचा दावा आहे. दोघांची हत्या केल्यानंतर आरोपीने दोन्ही मृतदेह बागेतील वेगवेगळ्या झुडपांमध्ये लपवून ठेवले.
इंस्टाग्रामवर ओळख, तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं; नंतर लॉजवर घेऊन गेला अन्…
२७ जुलै रोजी मंजू देवी यांचा मृतदेह सापडला होता. त्यांनतर सुमारे दहा दिवसांनी त्याच परिसरात जवळपास १०० मीटर अंतरावर असलेल्या झुडपांमधून दुर्गंधी येत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी शोधमोहीम राबवण्यात आली. त्यावेळी झुडपांमधून सहा वर्षीय आर्यनचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेले कपडे, मुलाची चप्पल तसेच इतर महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले. तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारे तपासाची दिशा विकास पासवान याच्याकडे वळली.
आरोपी अटकेत
पोलिसांनी विकास पासवान याला ताब्यात घेत चौकशी केली. तेव्हा चौकशीत आर्यनचा सांगण्यावरून मृत महिलेचा मोबाईल फोन आणि हिरव्या रंगाच्या द्रवाने भरलेली प्लॅस्टिकची बाटलीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. हे सर्व साहित्य पोलिसांनी पुढील तपासासाठी जतन केले. पोलिसांनी सांगितले की, जप्त केलेल्या सर्व पुराव्यांची फॉरेन्सिक आणि वैज्ञानिक तपासणी केली जाणार आहे. या तपासातून प्रकरणातील घटनाक्रम अधिक स्पष्ट होण्यास मदत होईल.
शालेय जीवनापासून ओळख…
प्राथमिक माहितीनुसार मंजू देवी आणि विकास पासवान हे शालेय जीवनापासून एकमेकांना ओळखत असल्याचे समोर आले आहे. दोघांमध्ये दोर्घकाळ संबंध असल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. दोघांची वेगवेगळी लग्ने झाली. त्यांनंतरही या दोघांमध्ये संपर्क कायम होते. विकास पासवान याने चौकशीदरम्यान आरोपीने मंजू देवी यांचे अन्य एका व्यक्तीसोबत संबंध असल्याची माहिती मिळाल्यामुळे तो नाराज होता. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्याने महिलेची हत्या केली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या आर्यनने संपूर्ण प्रकार पाहिल्यामुळे हा गुन्हा उघड होईल या भीतीने त्याचीही हत्या केली.
वडिलांनाही अटक
दोघांची हत्या केल्यानंतर आरोपीने दोन्ही मृतदेह बागेतील वेगवेगळ्या झुडपांमध्ये लपवून ठेवले. त्यांनतर तिथून तो पळून गेला. आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपावरून त्याचे वडील हरी पासवान यांनाही अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत असून पुढील तपास करत आहे.
Ans: विकास पासवान.
Ans: आईच्या हत्येचे सत्य उघड होऊ नये म्हणून.
Ans: मुख्य आरोपीला अटक करून मृतदेह व महत्त्वाचे पुरावे जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे.






