मुंबईतील बड्या अधिकाऱ्याच्या पत्नीने उचलले टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. ही घटना मुंबईच्या पश्चिम उपनगरातील आकुर्ली परिसरात ही घटना घडली आहे. पतीकडून आणि सासरच्या मंडळींकडून हुंडयाच्या कारणामुळे शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्यामुळे आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव रेणू कटरे (वय 44) असे आहे. रेणू कटरे हे म्हाडाचे उपनिबंधक बापू कटरे यांच्या पत्नी आहेत आणि रेणू कटरे या पेशाने शिक्षिका होत्या.
पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट; ‘या’ भागात घर फोडून सोन्याचे दागिने चोरले
पैसे देऊनसुद्धा छळ
रेणू कटरे त्यांच्या पतीसह कांदिवली परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत राहत होत्या. रेणू कटरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी अनेकदा आपल्या भावाला सासरी होणाऱ्या त्रासाविषयी सांगितले होते. रेणू कटरे यांना सासरच्या मंडळींकडून कमी हुंडा दिल्यामुळे सतत टोमणे मारत होती. ‘मी उच्चपदस्थ अधिकारी आहे. तुझी माझ्यासोबत राहण्याची लायकी नाही’, असे बोलून बापू कटरे यांनी पत्नी रेणू कटरेला अनेकदा हिणवले होते. ‘माझा त्रास कधीच थांबणार नाही. मी त्यांना नको आहे’, असे देखील रेणू यांनी आपल्या भावाला सांगितले होते. रेणू कटरे यांच्याकडे माहेरच्यांकडून पसे आणण्यासाठी सतत तगादा लावला जायचा. रेणू आणि बापू कटरे यांच्या लग्नानंतर रेणूच्या वडिलांनी 8 तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या दिल्या होत्या. २०२३ साली १२ लाख आणि २०२४ साली 10 लाख रुपये रेणू यांच्या सासरच्या मंडळींना दिले होते. तरी देखील रेणू कटरे यांचा मानसिक छळ आणि शारीरिक छळ सुरु होता. त्यांना काठीने मारहाण केली जात होती. असा आरोप रेणू कटरे यांच्या भावाने केला आहे.
या त्रासामुळे रेणू कटरे आणि बापू कटरे यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींनी २७ जुलै रोजी बैठक घेण्याचे ठरवले होते. परंतु ऐनवेळी बापू कटरे यांनी बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला. त्यामुळे रेणू यांची मानसिक स्थिती प्रचंड बिघडली होती. २६ जुलैला रेणू यांनी आपल्या भावाला फोन केला. त्यावेळी त्यांनी आपल्या भावला फोनवर पती विनाकारण मारहाण आणि शिवीगाळ करतात आणि वाद मिटवण्यासाठी बैठकीला येण्यासही त्यांनी नकार दिला असल्याचे सांगितले. रेणू कटरे यांचा उपचार एका डॉक्टरकडे सुरु होता. त्या डॉक्टरसोबत ‘पतीने फसवले, तो मिटींग टाळत आहे. मी त्यांना नको आहे’, एवढे बोलले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना परत कॉल केला तेव्हा त्यांनी कॉल उचलला नाही. त्यांनतर डॉक्टरांनी बापू कटरे यांना कॉल केला तेव्हा रेणूने स्वत:ला फ्लॅटमध्ये कोंडून घेतल्याचे बापू कटरे यांनी सांगितले.
समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बापू कटरे यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे. आता नुकताच गेल्या महिन्यात वैष्णवी हगवणे यांनी हुंड्यासाठी होणाऱ्या शारीरिक छळ आणि मानसिक छळला कंटाळून आत्महत्या केली होती. हा प्रकरण चर्चेत असतानाच अनेक महिलांनी या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. आता मुंबईचे म्हाडाचे उपनिबंधक बापू कटरे यांची शिक्षिका पत्नी रेणू कटरे यांनी टोकाचे पाऊल उचलत आपले आयुष्य संपवल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी बापू कटरेवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पोलीस आता यावर काय कारवाई करतात हे बघणं आता महत्वाचं ठरलं आहे..
ताम्हिणी घाटातील खूनाचा झाला उलगडा, मोठ्या भावानेच केला लहान भावाचा खून; कारण…