Photo Credit- Social Media बीडमध्ये काय चाललयं काय? महिला वकिलाला सरपंचासह १० जणांकडून जबर मारहाण
बीड: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आलेल्या बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस उजेडात येत आहे. संतोष देशमुख यांच्यानंतर दोन-तीन दिवसांपूर्वी भाजपच्या एका कार्यकर्त्यांची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. या घटना ताज्या असतानाच बीडच्या अंबेजोगाईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंबेजागाई येथील महिला वकिलाला गावच्या सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिला वकीलाने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण वृत्तांत माध्यमांना सांगितला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला वकील ज्ञानेश्वरी अंजना या अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करत आहेत. 14 एप्रिलला त्या घरात अभ्यास करत असताना घराजवळ असलेल्या मंदिरात मोठ्या आवाजात भोंगा सुरू झाला. पण भोंग्याच्या आवाजामुळे त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नव्हते. त्याचवेळी त्यांना मायग्रेन आणि पाठीच्या दुखण्याचाही त्रास सुरू झाला. पण तरीही त्यांनी सरपंच अनंत अंजाना यांना फोन करून भोंग्याचा आवाज कमी करण्याची विनंती केली.त्यांवर त्यांनी कर्मचाऱ्याला सांगून आवाज कमी करू असे सांगितले. पण दोन तास उलटूनही भोंग्याचा आवाज कमी होत नव्हता. त्यामुळे त्यांनी पुन्गा अनंत अंजान यांना फोन करून भोंग्याचा आवाज कमी करण्याची विंनती केली. पण त्यांनी कर्मचारी त्यांचा फोन उचलत नसल्याचे सांगितले.
Ranjit kasale: अकाऊंटला १० लाख अन् इव्हीएममध्ये छेडछाड; कासलेंचे पुन्हा धक्कादायक खुलासे
त्यानंतर त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन देवळातील आवाज कमी करण्याची विंनती केली. पण त्या कर्मचाऱ्यानेही त्याने नॉनव्हेज खाल्ल्यामुळे देवळात जाऊ शकत नाही, असे सांगत आवाज बंद करण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात फोन करून तक्रार दिली. पोलिसांनी हस्तक्षेप करून भोग्यांचा आवाज कमी केला. पण दुसऱ्याच दिवशी सरपंच आणि त्यांचे काही लोक त्यांच्या घरी आले. ज्ञानेश्वरी अंजान यांच्या आईवडिलांवर दबाव टाकत त्यांनी थेट तुम्हाला आमचे धार्मिक कार्यक्रम होऊ द्यायचेत की नाही, असे सवाल विचारत आई वडिलांशी वाद घालू लागले.
त्यापूर्वी त्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना या प्रकाराची कल्पना दिली होती. पण त्यांनीदेखील उद्या येऊन आवाज कमी करतो, अशी उपरोधिक उत्तरे दिली. आवाज सकाळपर्यंत सुरू राहिला तर मला अधिक त्रास होईल, तोपर्यंत मी काय करू,असा सवालही ज्ञानेश्वरी यांनी उपस्थित केला होता. पण काही केल्या आवाज कमी होत नव्हता म्हणून आपण पोलिसांकडे तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी हस्तक्षेप करून आवाज कमी केला. पण दुसऱ्या दिवशी सरपंच आणि त्यांच्या १० कर्मचाऱ्यांनी मिळून मारहाण केली. आईवडिलांवरही दबाव टाकला. ते इथेच थांबले नाहीत, तर त्यानंतर त्यांनी घराच्या बाजूलाच पिठाच्या गिरण्या सुरू केल्या, सततच्या आवाजामुळे मला गंभीर प्रकारचा मायग्रेन झाला. पाठदुखीचीही समस्या सुरू झाली, असं ज्ञानेश्वरी यांनी सांगितले.