Photo Credit- Social Media ( कोण आहे ही लॉरेन्स बिश्नोई गँग)
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांची काल (12 ऑक्टोबर) रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने राजकीय वर्तुळातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातही खळबळ उडाली आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचे कारण आणि त्या हत्येचा मुख्य सुत्रधार कोण याचा तपास कऱण्यात पोलिसांना यश आले आहे. लॉरेन्स बिश्नोई गॅंगने बाबा सिद्धीकी यांची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याच निमित्ताने पुन्हा एकदा बिश्नोई गँग चर्चेत आली आहे. पण हा लॉरेन्स बिश्नोई कोण आहे. ही बिश्नोई गँग कोण आहे, या गँगचा नेमका उद्देश काय आहे. असे प्रश्न अनेकांना पडत असतील.
पंजाबमधील फिरोजपूर12 फेब्रुवारी 1993 रोजी जन्मलेला लॉरेन्स बिश्नोईचा जन्म झाला. लॉरेन्सचे वडील 1992 मध्ये हरियाणा पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाले. मात्र पाच वर्षांनी नोकरी सोडून त्यांनी शेती सुरू केली. लॉरेन्सने पंजाब विद्यापीठातून एलएलबी पूर्ण केले आहे. 2009 मध्ये शिक्षणादरम्यान तो पंजाब विद्यापीठाच्या एका विद्यार्थी संघटनेत सामील झाला. त्यादरम्यान त्यांनी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष गोल्डी ब्रार याच्याशी भेट झाली. गोल्डीला भेटल्यानंतर आणि विद्यापीठाच्या विद्यार्थी राजकारणात सामील झाल्यानंतर बिष्णोईची पावले गुन्हेगारीच्या जगाकडे वळला. तो बेकायदेशीर कामात अडकू लागला. जवळपास दोन दशकांनंतर, लॉरेन्स बिश्नोई हा एक गुन्हेगारी जगतातला चेहरा म्हणून ओळखला जाऊ लागला. लॉरेन्स बिश्नोईच्या विरोधात राष्ट्रीय तपास संस्था आणि दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. लॉरेन्स सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगातील तुरुंग क्रमांक 8 मधील उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये कैद आहे. लॉरेन्स बिश्नोईवर खून आणि खंडणीचे दोन डझन गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा: पिगमेंटेशनमुळे चेहरा खराब झाला आहे? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पहा, पिगमेंटेशन होईल
लॉरेन्स बिश्नोई टोळी देशातील सर्वात मोठी टोळी बनली आहे. या टोळीत 600 शूटर्स आहेत. लॉरेन्स बिश्नोई टोळीचे जाळे देशभर पसरले आहे. या टोळीचे गुंड पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये सक्रिय आहेत.ही टोळी कॅनडा आणि दुबईतूनही कार्यरत आहे.लॉरेन्स बिश्नोई टोळीची बंबीहा गँगशी स्पर्धा आहे.
लॉरेन्स बिश्नोई टोळीचे तीन साथीदार, रोहित गोदारा, संपत नेहरा आणि वीरेंद्र चरण हे गुन्हे नियोजन, पैशाचा हिशेब आणि शस्त्रास्त्रे पुरवण्याची जबाबदारी सांभाळतात.सुखदेव सिंग गोगामेडी हत्याकांडातही लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचे बोलले जाते.लॉरेन्स बिश्नोईवर सलमान खानवर दोनदा हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. लॉरेन्स बिश्नोईवर सिद्धू मूसवाला यांच्या हत्येचाही आरोप आहे.
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या साबरमती मध्यवर्ती कारागृहातील उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवण्यात आला आहे. पण त्याने आपले जाळे अशा प्रकारे पसरवले की तो तुरुंगात असो की बाहेर याने त्याला फारसा फरक पडत नाही. याचा अर्थ असा की, तुरुंगात बसून तो अगदी सहजतेने वाटेल ते करतो. तुरुंगात बसून तो आपल्या शत्रूंच्या नावे कंत्राटे घेतो आणि तुरुंगात बसून करोडो रुपये वसूल करतो. एनआयएच्या चौकशीदरम्यान, त्याने त्याच्या कामाची संपूर्ण मोडस ऑपरेंडी आणि त्यातील प्रत्येक सत्य उघड केले होते.
हेही वाचा: सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी बनवा नाचणीच्या पिठाचा जाळीदार चिला