पिगमेंटेशनपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय
वाढत्या वयानुसार महिलांमध्ये अनेक समस्या दिसून येतात. वय वाढल्यानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या येणं, बारीक रेषा दिसणे, पिगमेंटेशन येणे इत्यादी अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवतात. त्यातील वयाच्या चाळीशीनंतर चेहऱ्यावर दिसून येणारी समस्या म्हणजे पिगमेंटेशन. पिगमेंटेशन वाढू लागल्यानंतर हळूहळू त्वचा काळी आणि खराब दिसू लागते. पण हल्लीच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात निर्माण झालेली कॅल्शियमची कमतरता, विटामिन, मिनरल्स इत्यादी गोष्टींमुळे पिगमेंटेशन वाढू लागतात. चेहऱ्यावर आलेले काळे डाग घालवण्यासाठी महिला अनेक वेगवेगळे प्रयत्न करतात. मात्र तरीसुद्धा हे डाग जात नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पिगमेंटेशनमुळे खराब झालेली त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: रविवारी नखं का कापू नये माहितेय? जाणून घ्या कारण
बटाट्याचा रस त्वचा उजळ्वण्याचे काम करतो. तसेच त्वचेवरील डाग घालवण्यासाठी अनेकदा बटाट्याच्या रसाचा वापर केला जातो. यासाठी बटाटा किसून त्यातील रस काढून घ्या. त्यानंतर रस संपूर्ण चेहऱ्यावर सगळीकडे लावा. यामुळे त्वचा थंड राहील. त्यानंतर १५ मिनिट ठेवल्यावर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय नियमित केल्यास त्वचेवरील पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होईल आणि त्वचा सुंदर आणि चमकदार दिसेल.
आयुर्वेदिक गुणधर्म असलेल्या तुळशीच्या पानाचा वापर त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहे. तुळशीची पाने घेऊन मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. त्यानंतर तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावून १५ मिनिटं ठेवा. यामुळे पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होईल. १५ मिनिटांनी त्वचा स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय नियमित हा उपाय केल्यास त्वचेवरील डाग निघून जातील.\
हे देखील वाचा: चेहऱ्यावर बर्फ लावताय मग जरा थांबा, नीट विचार करा
लिंबाच्या रसात असलेले गुणधर्म त्वचेवरील बॅक्टरीया मारून टाकण्यास मदत करतात. लिंबाच्या रसाचा वापर त्वचेवरील थेट करून नये. वाटीमध्ये लिंबाचा रस घेऊन त्यात बदामाचे तेल टाकून मिक्स करून घ्या. नंतर संपूर्ण चेहऱ्यावर लावा. १५ मिनिट ठेवल्यावर चेहरा स्वच्छ धुवा.