गुंतवणुकीतून ज्यादा पैशांचे आमिष दाखवून विधवेची फसवणूक
नागपूर : म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवून करून बक्कळ नफा कमावण्याचे आमिष दाखवून एका ठकबाजाने पत्नी व भावासोबत मिळून एका विधवा महिलेची फसवणूक केली. या ठकबाजाने तब्बल एक कोटी 10 लाख 90 हजार रुपयांनी फसवणूक केली. हा प्रकार कोतवाली पोलिस ठाण्यांतर्गत उपडकीस आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी वर्षा मंगेश ठाकरे (वय ३९, रा. रामजी निवास, दसरा रोड, महाल) यांच्या तक्रारीवरून तिन्ही आरोपींविरुद्ध नोंदविला आहे. राम जगजीवनदास वसानी (वय ४३), सेजाल राम वसानी (वय ४३, दोन्ही रा. साई पाइ, छापरूनगर) आणि नरेश जगजीवनदास वसानी (वय ५४, रा. व्यंकटेशनगर, नंदनवन) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी मुख्य आरोपी राम याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावाली आहे.
हेदेखील वाचा : Google Fraud Alert: तुमच्या स्मार्टफोनमधून आत्ताच डिलीट करा हे 9 Apps, अन्यथा हॅकर्स रिकामं करतील तुमचं बँक अकाऊंट
वर्षा यांनी पतीच्या मृत्यूपूर्वी विम्याच्या दोन पॉलिसी काढल्या होत्या. निधनानंतर वर्षा यांनी विमा कार्यालयात संपर्क केला त्यांना व त्यांच्या मुलाला विम्याची 1 कोटी 10 लाख 90 हजारांची रक्कम मिळाली. आरोपी नरेश हा मंगेशकडे काम करायचा मंगेशच्या निधनानंतर विम्याची रक्कम मिळाल्याची माहिती नरेशला होती.
दरम्यान, नरेशने आरोपी राम आणि त्याची पत्नी सेजल यांची वर्षासोबत ओळख करून दिली. राम आणि सेजलने कोटक म्युचुअल फंडात गुंतवणूक केल्यास भरघोस लाभ मिळेल, असे वर्षाला आमिष दाखविले. वर्षा यांनी म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्यास दिलेली रक्कम रामने स्वतःच्या खात्यात टाकून आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास केला जात आहे.
OTP शिवाय केली जाते फसवणूक
सध्या स्कॅमर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी सतत नवनवीन पद्धती शोधत असतात. कधी ओटीपी स्कॅम तर कधी तुमच्या व्हाट्सअपवर आमंत्रण पत्रिका येते. आता देखील स्कॅमर्सनी लोकांना फसवण्यासाठी नवीन पद्धत शोधली आहे आणि या पद्धतीमध्ये ओटीपीची देखील गरज भासत नाही. ओटीपीशिवाय स्कॅमर्स तुमचे बँक अकाउंट रिकामं करू शकतात. यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये स्कॅमर्स लोकांकडून ओटीपी मागतात आणि लोकांचे बँक अकाउंट रिकामं करतात. मात्र, आता असं होणार नाही. तुमचं बँक अकाउंट रिकामं करण्यासाठी ओटीपीची देखील गरज नाही. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे बनले आहे.