America Shutdown : अमेरिकेत ४३ दिवसानंतर सरकारी कामकाजाला हिरवा झंडा; ट्रम्प यांनी फंडिग बिलावर केली स्वाक्षरी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
America Shutdown News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. ४३ दिवसाच्या शटडाऊननंतर ट्रम्प सरकारचे निधी विधेयक मंजूर झाले असून सरकारी कामकाजाल लवकरच सुरुवात होईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील या फंडिग बिलावर स्वाक्षरी केली आहे. हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात चांगला दिवस होता असे ट्रम्प यांनी म्हटले.
America Shutdown : अमेरिकेतील शटडाऊन लवकरच संपणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले उत्तर
व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी(१२ नोव्हेंबर) अमेरिकन काँग्रेसने निधी विधेयक मंजुर केले असून ट्रम्प यांनी यावर ओव्हल ऑफिसमध्ये स्वाक्षरी केली आहे. यामुळे अमेरिकेच्या सामान्य जनतेला देखील मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच विनावेतन सुट्टीवर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना देखील आनंद झाला आहे.
हे अमेरिकेच्या इतिहासातील दुसरे सर्वात मोठे शटडाऊन होते. यापूर्वी अध्यक्ष ट्रम्प यांच्या काळात २०२० मध्ये ३५ दिवसांसाठी शटडाऊन लागू झाले होते. आताचे २०२५ चे शटडाऊनचे मुख्य कारण म्हणजे, निधी विधेयकातील हेल्थ सबसिडीवर रिपल्बिकन आणि डेमोक्रॅट्स मधील मतभेद.
डेमोक्रॅट पक्षाने या हेल्थ केअर सबसिडीत वाढ करण्याची मागणी केली होती, पण ट्रम्प सरकारने याला नकरा दिला होता. यामुळे सरकारचा अनैतिक खर्च वाढेल असे म्हटले होते. तसेच दोन्ही बाजूंनी चर्चा करुन तोडगा काढण्यासाठी कोणीही तयार नव्हते.
VIDEO | US House passed a bill to end the nation’s longest government shutdown, sending the measure to President Donald Trump for his signature after a historic 43-day funding lapse that saw federal workers go without multiple paychecks, travellers stranded at airports. (Source:… pic.twitter.com/crcX4HZvgm — Press Trust of India (@PTI_News) November 13, 2025
आता हे निधी विधेयक मंजूर झाले असून सरकारी कामकाजाला तातडीने सुरुवात करण्यात येणार आहे. ३० जानेवारी २०२६ य नवीन निधीची अंतिम तारीख असणार आहे, परंतु तज्ज्ञांच्या मते, यामुळे २०२६ अखेरपर्यंत अनेक सरकारी कामकाजांना निधी मिळणार आहे.
अमेरिकेच्या सिनेटमध्ये निधी विधेयकायवर ११ वेळा मतदान करण्यात आले होते, पण ट्रम्प सरकारला ६० पैकी केवळ ५५ मते मिळाली होती. यामुळे देशातील लष्कर, हवाई सेवा यांसारख्या अनेक कामकाजांवर मोठा परिणाम झाला होता. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. तसेच याचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवरही परिणाम झाला आहे.
प्रत्येक देशाचा एक वार्षिक खर्चाचा आराखडा दरवर्षी तयार केला जातो. पण या खर्चावर सरकारमध्ये राजकीय मतभेद किंवा एकमत झाले नाही याला कायदेशीररित्या मान्यता मिळत नाही. अशा परिस्थिती सरकारला अनावश्यक सेवा बंद कराव्या लागतात. यालाच सरकारी शटडाऊन म्हणतात. अमेरिकेत देखील रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रॅट्समधील आरोग्य सेवांवरील सबसिढी वाढवण्याचा मतभेदांमुळेच सरकारी कामकाज ठप्प झाले होते.
America Shutdown : अमेरिकेत शटडाऊनमुळे हवाई सेवेवर मोठा परिणाम ; दोन दिवसांत हजारो उड्डाणे रद्द






