टाकळी हाजीत महिलेला कुऱ्हाड व फावड्याने मारहाण; 'त्या' महिला शेतात आल्या अन्... (File Photo)
शिक्रापूर : डिंग्रजवाडी (ता.शिरुर) येथील एका शेतात शौचास जाणाऱ्या उसतोड कामगार महिलेला पाईपने बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संदीप पोपट गव्हाणे या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
कोरेगाव भीमा (ता.शिरुर) येथील संदीप गव्हाणे यांच्या घराच्या शेजारी दहा दिवसांपासून काही उसतोड कामगार राहत असून, सकाळच्या सुमारास उषाबाई गायकवाड या गव्हाणे यांच्या शेताकडे शौचास जात असताना संदीप गव्हाणे या इसमाने शेताकडे येत ‘तुम्ही शेतात शौचास का येता? तुमच्याकडे बघतोच…’ असे म्हणून महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत पाईपने मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, महिलेले आरडाओरडा केल्याने शेजारील वयोवृध्द महिला तिला सोडवण्यासाठी आली असता संदीप याने तिला देखील मारहाण केली. याबाबत उषाबाई ज्ञानेश्वर गायकवाड (वय ४० वर्षे सध्या रा. डिंग्रजवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी संदीप पोपट गव्हाणे (रा. डिंग्रजवाडी ता. शिरुर जि. पुणे) या इसमावर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नवनाथ नाईकडे हे करत आहे.
शिक्रापूरमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न
शिक्रापूरमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. निमगाव दुडे (ता.शिरुर) येथील रवींद्र रणसिंग यांनी काही दिवसांपूर्वी नितीन गावडे यांच्या विरोधात खुनाची तक्रार दाखल केली होती. असे असताना सदर तक्रार मागे घेण्यासाठी रवींद्र रणसिंग यांसह त्यांचा आत्या भाऊ राजू थोरात यांना मारहाण करत रवींद्र यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. तसेच मारहाण अन् दमदाटी करत रवींद्रच्या पत्नीच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेल्याची घटना घडली. त्यामुळे शिरूर पोलीस स्टेशन येथे बाबू प्रभाकर वाळुंज, सोनू बाबा पटेल यांसह बाबूचा चुलत भाऊ यांसह तीन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.