नातवाला भेटायला गेलेल्या महिलेला बेदम मारहाण
धाराशिव : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता नातवाला भेटण्यासाठी गेलेल्या एका महिलेला तिच्या मुलीच्या सासरच्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
उपाबाई काशिनाथ वाघमारे, धम्मपाल काशिनाथ वाघमारे (वय ३५, दोघे रा. गेट क्रं. ५६, मुकुंदवाडी) अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात जिजाबाई रत्नाकर साळवे (वय ५०, रा. बौद्धनगर, जवाहर कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी पतीसोबत पटत नसल्याने सध्या माहेरी राहते. मात्र, तिचा सात वर्षांचा मुलगा सासरीच म्हणजे वाघमारे यांच्या कुटुंबासोबत राहतो.
शनिवारी (दि.८) सकाळी अकराच्या सुमारास जिजाबाई साळवे या आपल्या नातवाला भेटण्यासाठी वाघमारे यांच्या घरी गेल्या होत्या. त्या वेळी मुलीची सासू उषाबाई काशिनाथ वाघमारे हिने ‘तू आमच्या घरी कशाला आलीस?’ असे म्हणत शिवीगाळ केली आणि चप्पल फेकत फिर्यादीच्या तोंडावर हाताने मारहाण केली.
लाकडी दांडक्यानेही केली बेदम मारहाण
याचवेळी तिचा मुलगा धम्मपाल वाघमारे हा देखील तिथे आला. त्याने तुला जिवंत ठेवत नाही, अशी धमकी देत शिवीगाळ केली आणि जवळ पडलेल्या फावड्याच्या लाकडी दांड्याने फिर्यादीच्या डोक्यात वार करुन जखमी केले. प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार कचरे करीत आहेत.
सिगारेट न दिल्याच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण
हातगाडीवर काम करणाऱ्या १८ वर्षीय तरुणाला सिगारेट न दिल्याचा राग आल्याने दोघांनी काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मोरवाडी चौक येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! क्षुल्लक कारणावरून विवाहितेचा छळ; माहेरहून तीन लाखांची मागणी केली अन् नंतर…






