पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला; पोटातच चाकू खुपसला अन् तरुण... (File Photo : Crime)
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडताना दिसत आहे. असे असताना संभाजीनगरमध्ये पूर्ववैमनस्यातून एका तरुणाच्या पोटात चाकू भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली. ही घटना रविवारी (दि.10) सायंकाळी नक्षत्रवाडी परिसरात घडली.
अजय मुगदल असे चाकू भोसकणाऱ्याचे नाव असून, त्याच्या विरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर निलेश पागोरे (वय २५) असे गंभीर तरुणाचे नाव असून, त्याच्यावर घाटी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. प्रकरणात निलेश पागोरे याचे वडील दादासाहेब बाबासाहेब पागोरे (वय ५५, रा. नक्षत्रवाड, पैठण रोड) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, निलेश पागोरे हा हल्ल्यावेळी नक्षत्रवाडी, पैठण रोड येथील विठ्ठल रेसिडेन्सी फेज-३ अपार्टमेंटजवळ उभा असताना अचानक हल्ला झाला. हल्ला एवढा जोरदार होता की निलेश काही क्षणातच रस्त्यावर कोसळला. मात्र, परिसरातील नागरिकांनी पोलिसांना फोन केला.
जुन्या वादातून हल्ला
घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान, घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी निलेशला घाटी रुग्णालयात हलवले. घाटी रुग्णालयात निलेशने आपल्या वडिलांना सांगितले की, अजय मुगदल याने जुन्या वादातून माझ्या पोटात चाकू भोसकला. त्यावेळी अजयचा चुलता चंदु मुगदल हा देखील तेथे उपस्थित होता. पण त्याने अजयला त्याने फिर्यादीला दिली.
‘मला पाणी द्या…’
निलेशचा पिवळा शर्ट आणि काळी पँट रक्ताने भिजलेली होती. मला पाणी द्या, मला थंडी वाजतेय असे तो वेदनांनी तडफडत फिर्यादीला म्हणाला. डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन उपचार सुरू आहे.
भिवंडीत दुहेरी हत्याकांड
भिवंडी शहरात झालेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण ठाणे जिल्हा हादरला आहे. मंगळवारी रात्री सुमारे ११ वाजता धारदार शस्त्राने भाजप जिल्हा उपाध्यक्षासह एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्या झालेल्यांमध्ये भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षाचा समावेश असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे.