कोथरूड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांवर तीन तरुणींनी मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप केला होता या घटनेनें पुण्यातील पोलीस दलात खळबळ माजली होती. तरुणींनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली खरी मात्र गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी नकार दिला. कोणत्याही घटनेत गुन्हा दाखल करत असताना पुरावे पाहिले जातात मात्र यामध्ये मुलींनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पुरावे नसल्याचं सांगत गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. या घटनेची दखल सगळ्याच राजकीय पक्षांनी घेतली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत कायदा आणि सुव्यवस्थेवरती सरकारला प्रश्न विचारला होता. राज्य महिला आयोगानेही या घटनेची दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तक्रार देणाऱ्या मुलींशी संवाद साधत त्यांची बाजू जाणून घेण्याचं प्रयत्न केला. या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीं कारवाई करावी अशी प्रशासनाकडे मागणी केली आहे.
Nagpur Accident : दारूच्या नशेत जवानाने भरधाव चालवली कार; ३० जणांना मारला कट, जमावाने दिला चोप
मुलीनी तक्रार दिल्यानंतर तक्रार दाराच्या वकिलांनी पोलिसांसमोर बाजू मांडण्याच्या प्रयत्न केला. या मुली काय लहान नाहीत त्या खोटं तर बोलत नसतील, त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन गुन्हा दाखल करावा. मात्र पुणे पोलिसांनी चार ओळींचा पत्र मुलीना दिल्यानं पोलीस प्रशासना विरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे. मुलींच्या तक्रारीनुसार मुलींनी आरोप केले होते. तुम्ही काय रां## आहात कि लेस्बियन आहात. आता पर्यंत किती जणांसोबत झोपलात. जातीचा उल्लेख करून शेरे बाजी केल्याचं आरोप या मुलींनी केला होता. या प्रकरणात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करता येणार नाही असं पोलिसांनी म्हंटल आहे. घडलेली घटना ही सार्वजनिक ठिकाणी घडली नाही. त्याचे कोणतेही पुरावे नाहीत आणि अॅट्रोसिटीच्या अनुषंगाने केलेल्या तक्रारीत कोणताही तथ्य आढळलं नसल्याचं पोलिसांनी म्हंटल आहे.
रात्री पोलिसठाण्यात काय घडलं?
या पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल होत नाही म्ह्णून रात्री साडेबारा पर्यंत पोलीस ठाण्यात सामाजिक कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता. गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत उठणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला. गुन्हा का दाखल केला जात नाही म्हणून वकिलांकडून बाजू मांडण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल असमर्थता दर्शविली. ज्या वेळेस गुन्हा दाखल करता येणार नाही असं पत्र मुलींना दिलं त्यावेळेस पोलीस ठाण्यासमोर पत्र फाडत मुलींनी आपला रोष व्यक्त केला.
याप्रकरणात कारवाई का नाही?
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे थेट पोलिसानं समोर संतापलेले पाहायला मिळाले. गुन्हा का दाखल करून घेतला जात नाही. असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आता पोलिसांकडून गुन्हा दाखल करता येणार नाही असा पत्र दिल्यांनतर आज दिवसभरात वंचित बहुजन आघाडीकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र या प्रकरणात राजकीय दबाव असल्याने गुन्हा दाखल होत नसल्याची चर्चा आहे.