गळा चिरून तरुणाची केली हत्या (संग्रहित फोटो)
चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडत आहेत. असे असताना चंद्रपुरात खूनप्रकरण समोर आले आहे. घरात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञाताने तरुणाचा गळा चिरून हत्या केली. ही घटना सिंदेवाही तालुक्यातील मोहाळी येथे शुक्रवारी (दि.19) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
राजू आनंदराव सिडाम (वय 35, रा. मोहाळी, ता. सिंदेवाही) असे मृताचे नाव आहे. मृत तरुण दारू विक्रीचा व्यवसाय करत होता. त्यामुळे त्या वादातूनच खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. राजू व त्याची पत्नी पूनम, मुलगा मेहरदीप व मुलगी वैष्णवी मजुरीचे काम करण्यासाठी वरोरा येथे भाड्याच्या घरात वास्तव्यास होते. परंतु, त्याला दारूचे व्यसन असल्याने घरमालक फार काळ ठेवायचे नाही. त्यामुळे पत्नीला तेथेच ठेवून तो अलीकडेच त्याने अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता.
हेदेखील वाचा : बेदम मारहाण करून भावाची हत्या; आईसह वहिणीनीही होती साथ, शवविच्छेदन अहवाल आला अन्…
दरम्यान, घरात कोणीही नसताना त्याची हत्या करण्यात आली. शुक्रवारी सकाळच्या सुमारास त्याच्या घरी त्याचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला असून, त्याचा खून कोणत्या कारणामुळे व कुणी केला, याचा तपास पोलिस घेत आहेत.
श्वान पथकाला पाचारण
यासाठी पोलिसांनी श्वानपथक व फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण केले होते. आरोपी ज्या दिशेने पळाले त्या दिशेला श्वान फिरून आला. रात्री त्याच्या घरी आलेल्या लोकांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी फिर्यादी पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलिस करीत आहेत. या घटनेमुळे नागरिकांत विविध चर्चाण उधाण आले आहे.
हेदेखील वाचा : Crime News: 8 महिलांना बनवले वासनेचे बळी, योग गुरू निरंजन मूर्तीला 17 वर्षाच्या मुलीमुळे झाली अटक