दिल्ली : आझाद मार्केट परिसरात चार मजली इमारत कोसळली (Building Collapse)आहे. या इमारतीखाली ६ ते ७ जण दबल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याचे विभागाने सांगितले. सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली आहे.
आझाद मार्केट जवळ (Azad Market) नुकतीच बांधण्यात इमारत आली आहे. अजूनही या इमारतीत बांधकाम (New Building) सुरू होते. इमारतीमध्ये केबल टाकण्याचे काम चालू होते. पोलिसांनी आतापर्यंत चार लोक जखमी झाल्याचे सांगितले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अग्निशमन दल आणि पोलीस विभागाचे (Delhi Police) अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. घटनेच्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, इमारत कोसळली तेव्हा इमारतीमध्ये मोठा स्फोट झाला, त्यानंतर दोन जण गंभीर जखमी झाले, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Delhi | Two persons injured, five persons feared trapped in building collapse in Azad Market area; search & rescue operation underway pic.twitter.com/6TmWegdmj2 — ANI (@ANI) September 9, 2022






