दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचा विजय, तर भाजपचे रमेश बिधुरी पराभूत (फोटो सौजन्य-X)
KALKAJI Seat Election Result 2025 Marathi: दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी कालकाजी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. तर आतिशी यांनी भाजपचे रमेश विधुरी आणि काँग्रेसच्या अलका लांबा यांचा पराभव केला. दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी कालकाजी मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे.
दिल्लीतील कालकाजी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाशी झालेल्या चुरशीच्या लढतीत आम आदमी पक्षाने विजय मिळवला आहे. आप आणि भाजपमध्ये जोरदार लढत झाली, त्यानंतर मुख्यमंत्री आतिशी यांनी भाजपचे रमेश बिधुरी यांचा पराभव करून निवडणूक जिंकली. या जागेवर काँग्रेसने अलका लांबा यांना उमेदवारी दिली होती.
Arvind Kejriwal: दिल्लीत ‘आप’ चा सुपडा साफ! अरविंद केजरीवाल यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव
मतमोजणीदरम्यान अनेक फेऱ्यांमध्ये आतिशी भाजपच्या रमेश बिधुरी पिछाडीवर होते. मात्र हळूहळू बिधुरी यांच्या मतांमधील अंतर कमी केले आणि शेवटी विजयी झाल्या. कालकाजी मतदारसंघातून पुन्हा विजयी झालेल्या आम आदमी पक्षाच्या आतिशी यांनी चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यासह त्या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होताच. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष (आप) सलग तिसऱ्यांदा विजयी होणार की भाजप राजधानीतील २७ वर्षांचा सत्तेचा दुष्काळ संपवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
२००८ मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर सीमांकन आयोगाने कालकाजी विधानसभा मतदारसंघाची निर्मिती केली. कालकाजी हा दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे आणि इतर नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये – बिजवासन, संगम विहार, आंबेडकर नगर, छत्तरपूर, देवली, तुघलकाबाद, पालम, बदरपूर आणि मेहरौली यांचा समावेश आहे. कालकाजी मंदिर हे देवी कालीला समर्पित एक प्रसिद्ध मंदिर आहे. ते दक्षिण दिल्लीत आहे. या परिसराचे नाव मंदिरावरून पडले आहे. ते नेहरू प्लेसच्या समोर आणि ओखला रेल्वे स्टेशन, कालकाजी मंदिर मेट्रो स्टेशन जवळ आहे.
आम आदमी पक्षाच्या आतिशी यांना ५५,८९७ मते मिळाली (विजयी)
भाजपचे धरमबीर यांना ४४,५०४ मते मिळाली.
काँग्रेसच्या शिवानी चोप्रा यांना ४,९६५ मते मिळाली.
आम आदमी पक्षाचे अवतार सिंग यांना ५५,१०४ मते मिळाली (विजयी)
भाजपचे हरमीत सिंह कालका यांना ३५,३३५ मते मिळाली.
काँग्रेसचे सुभाष चोप्रा यांना १३,५५२ मते मिळाली.
Manish Sisodia : दिल्लीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का, मनिष सिसोदिया यांचा पराभव