दिल्लीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का, मनिष सिसोदिया यांचा पराभव (फोटो सौजन्य-X)
Delhi Election Results 2025 news Marathi: दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल येऊ लागले आहेत. सर्वात आश्चर्यकारक निकाल जंगपुरा येथून येत आहे. येथे आम आदमी पक्षाचे (आप) उमेदवार आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल येऊ लागले आहेत. सर्वात आश्चर्यकारक निकाल जंगपुरा येथून येत आहे. येथे आम आदमी पक्षाचे (आप) उमेदवार आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे. आम आदमी पक्षाचे (आप) नेते मनीष सिसोदिया उमेदवार झाल्यानंतर जंगपुरा विधानसभा जागा व्हीआयपी जागा ठरली होती. मात्र सिसोदिया यांना ३८,१८४ मते मिळाली, तर तरविंदर यांना ३८,८५९ मते मिळाली.
Delhi Assembly Election Result 2025 live: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पराभूत
मनीष सिसोदिया यांचा भाजपचे तरविंदर सिंग मारवाह यांनी पराभव केला आहे. दारू घोटाळ्यात अटक झाल्यानंतर जामिनावर सुटलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी यावेळी पटपडगंज जागा सोडली आहे आणि ते जंगपुरा येथून निवडणूक लढवत आहे. पक्षाने त्यांचे विद्यमान आमदार प्रवीण कुमार यांचे तिकीट कापले होते आणि सिसोदिया यांना जंगपुरा येथून उमेदवारी दिली होती परंतु त्यांना जागा जिंकता आली नाही.
२०१३ हे वर्ष दिल्लीतील राजकारण बदलत होते. त्याच वर्षी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने दिल्लीत सत्ता काबीज केली. १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसला ‘आप’ने दारुण पराभव दिला. यावर्षी जंगपुरा येथे काँग्रेस आणि आप यांच्यात थेट लढत होती. आपचे मनिंदर सिंग धीर यांना २९७०१ आणि काँग्रेसचे तरविंदर सिंग मारवाह यांना २७९५७ मते मिळाली. मनिंदर यांच्या विजयाचे अंतर १७४४ मतांचे होते. यावर्षी तीन वेळा आमदार राहिलेले तरविंदर सिंग मारवाह यांचा पराभव झाला.
२०१५ मध्ये, २०१३ मध्ये आप कडून विजयी झालेले मनिंदर सिंग धीर यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि २३४७७ मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आले. प्रवीण कुमार यांनी आपकडून निवडणूक लढवली आणि ४३९२७ मतांनी विजयी झाले. या दोघांमधील विजयाचे अंतर २०४५० मतांचे होते. २०२० च्या निवडणुकीत ‘आप’ने येथून विजयाची हॅट्रिक गाठली. एपीपीचे प्रवीण कुमार १६०६३ मतांनी विजयी झाले.