दिल्लीत काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव! काँग्रेसच्या 0 जागा, निवडणूक आयोगाने दिली माहिती (फोटो सौजन्य-X)
No seat for Congress in Delhi Marathi: दिल्ली विधानसभा निवडणुकीची Delhi Election Result 2025 मतमोजणी सुरू असून आतापर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार भाजपला बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने आतापर्यंत एकाच एका जागेवर आपले खाते उघडले होते, परंतु आता त्या जागेवरही काँग्रेस पिछाडीवर आहे. एकंदरित काय तर दिल्लीत काँग्रेसचा लाजिरवणार पराभवाला सामोरे जावं लागत आहे. दिल्लीच्या बादली जागेवर काँग्रेस आघाडीवर होती, पण आता काँग्रेस पुन्हा शून्यावर पोहोचली आहे. काँग्रेसने येथून देवेंद्र यादव यांना उमेदवारी दिली आहे.
मतमोजणीदरम्यान मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या बादली विधानसभा मतदारसंघात आता बदल दिसून येत आहे. येथून उमेदवार देवेंद्र यादव आता पिछाडीवर आहे. राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा दोघांनीही बादली मतदारसंघात त्यांच्या उमेदवाराच्या बाजूने प्रचार केला.
या विधानसभा जागेवर आम आदमी पक्षाने आपला जुना उमेदवार अजेश यादव यांना उमेदवारी दिली आहे. त्याच वेळी भाजपने बादली मतदारसंघातून अहिर दीपक चौधरी यांच्या नावावर विश्वास व्यक्त केला होता, तर काँग्रेसने पुन्हा एकदा या जागेवर त्यांचे माजी उमेदवार देवेंद्र यादव यांना संधी दिली होती.
२०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचे अजेश यादव यांनी ही जागा २९,०९४ मतांनी जिंकली. त्यांना ४९.६५% मते मिळाली आणि ६९,४२७ मते मिळाली. त्यांनी भाजपचे विजय कुमार भगत यांचा २९०९४ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत विजय कुमार भगत यांना एकूण ४०३३३ (२८.८४%) मते मिळाली.
जर आपण २०१५ सालाबद्दल बोलायचं झालं तर, २०१५ मध्ये येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार अजेश कुमार यादव यांनी काँग्रेसचे देवेंद्र यादव यांचा ३५३७६ मतांनी पराभव केला. जिथे अजेश कुमार यादव यांना ७२७९५ मते मिळाली. तर देवेंद्र यादव यांना ३७४१९ मतांवर समाधान मानावे लागले. आतापर्यंत भाजप १८ जागांवर, आप ८ जागांवर आघाडीवर आहे. केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून आणि मनीष सिसोदिया जंगपुरा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. त्याच वेळी, कालकाजी मतदारसंघातून मुख्यमंत्री आतिशी पिछाडीवर आहेत.
देवेंद्र यादव हे पंजाबचे पक्ष प्रभारी आहेत. याआधी त्यांनी उत्तराखंडचे प्रभारीपदही भूषवले आहे. यादव २००८ ते २०१३ आणि २०१३ ते २०१५ पर्यंत बादली येथून काँग्रेसचे आमदार होते. तथापि, गेल्या दोन निवडणुकांमध्ये ‘आप’ ही जागा जिंकत आहे. आम आदमी पक्षाचे उमेदवार अजेश यादव गेल्या १० वर्षांपासून बादलीचे आमदार आहेत आणि यावेळी ते हॅट्रिक करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपने दीपक चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. बादली विधानसभा जागा उत्तर-पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघात येते.
Delhi Assembly Election Result 2025 live: भाजपची विजयाकडे घौडदौड सुरू…