कोणाची सत्ता येणार? पुन्हा भाजप मारणार का बाजी (फोटो सौजन्य - Instagram)
Delhi Assembly Election Result 2025 live updates: जर ‘आप’ने दिल्ली निवडणूक जिंकली तर तो एक विक्रम असेल. यातून सर्वात मोठा संदेश देशभर जाईल की आम आदमी पक्ष आता भाजपला रोखण्यासाठी सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येणार आहे. अरविंद केजरीवाल असा समज निर्माण करण्याचा प्रयत्न करतील की जर कोणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देऊ शकते तर ते स्वतः आहेत. आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे आणि संपूर्ण जगाचे याकडे लक्ष लागून राहिले आहे
08 Feb 2025 01:36 PM (IST)
दिल्ली विधानसभा निवडणुकीसोबतच, उत्तर प्रदेशातील एका जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी याबाबत एक विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की हा खोटा विजय आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, "भाजपा मतांच्या आधारे पीडीएच्या वाढत्या शक्तीचा सामना करू शकत नाही, म्हणूनच ते निवडणूक व्यवस्थेचा गैरवापर करून जिंकण्याचा प्रयत्न करते."
08 Feb 2025 01:28 PM (IST)
शकूरबस्ती विधानसभेतू सत्येंद्र जैन पराभूत
मनिष सिसोदियांची जंगपुरामधून ६०० मतांनी हार
पटपडगंजमधून अवध ओझा पराभूत
नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल पराभूत
08 Feb 2025 01:03 PM (IST)
आपच्या आतिशी मार्लेना विजयी
08 Feb 2025 01:01 PM (IST)
आपचे मनिष सिसोदिया पराभूत झाले आहेत
08 Feb 2025 12:42 PM (IST)
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार अरविंद केजरीवालांचा पराभव झाल्याचे दिसून येत आहे. अरविंद केजरीवाल यांना 20190 तर भाजपच्या प्रवेश सिंग यांना 22034 मतांनी आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत मतमोजणीच्या जवळपास अकरा फेऱ्याही संपल्या आहेत.
08 Feb 2025 12:12 PM (IST)
ओखला
ओखला विधानसभा मतदारसंघातून भाजपचे मनीष चौधरी आघाडीवर आहेत, तर आपचे अमानतुल्ला खान पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे अरिबी खान तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
मुस्तफाबाद
मुस्तफाबाद विधानसभा मतदारसंघातून भाजपचे मोहन सिंग बिश्त आघाडीवर आहेत, तर आम आदमी पक्षाचे आदिल अहमद खान दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि भाजपचे अली मेहदी तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
करावल नगर
करावल नगर मतदारसंघातून भाजपचे कपिल मिश्रा आघाडीवर आहेत, तर आपचे मनोज कुमार त्यागी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. काँग्रेसचे डॉ. पीके मिश्रा तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
चांदणी चौक
दिल्लीच्या चांदणी चौक विधानसभा मतदारसंघातून आपचे पुनर्दीप सिंह आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे मुदित अग्रवाल दुसऱ्या आणि भाजपचे सतीश जैन तिसऱ्या स्थानावर आहेत.
बाबरपूर
बाबरपूर विधानसभा मतदारसंघातही आप आघाडीवर आहे. गोपाल राय आघाडीवर आहेत, भाजपचे अनिल कुमार वशिष्ठ दुसऱ्या आणि काँग्रेसचे मोहम्मद इशराक खान तिसऱ्या स्थानावर आहेत.
बल्लीमरन
बल्लीमारन मतदारसंघातून आपचे इम्रान हुसेन आघाडीवर आहेत. भाजपचे उमेदवार कमल बागडी दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि काँग्रेसचे हारून युसूफ तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
मतिया महल
मतियामहल मतदारसंघातून आपचे उमेदवार अले मोहम्मद इक्बाल आघाडीवर आहेत, तर भाजपच्या दीप्ती इंदोरा दुसऱ्या आणि काँग्रेसचे असीम अहमद खान तिसऱ्या स्थानावर आहेत.
सीलमपूर
सीलमुप्पारमध्ये आपचे चौधरी झुबेर अहमद भाजप उमेदवार अनिल कुमार शर्मा (गौर) यांच्यावर आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे अब्दुल रहमान तिसऱ्या स्थानावर आहेत.
सीमापूर
सीमापुरीमध्ये आपचे वीर सिंह धिंगन आघाडीवर आहेत. ते ५,५७२ मतांनी आघाडीवर आहेत. भाजप उमेदवार रिंकू दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि काँग्रेसचे राजेश लिलोठिया तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
जंगपुरा
जंगपुरा मतदारसंघातून आपचे उमेदवार आणि दिल्लीचे माजी मंत्री मनीष सिसोदिया आघाडीवर आहेत, तर भाजपचे तरविंदर सिंग मारवाह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
किराडी
किराडीमध्ये आपचे अनिल झा आघाडीवर आहेत, तर भाजपचे उमेदवार बजरंग शुक्ला दुसऱ्या क्रमांकावर आहेत. काँग्रेसचे राजेश कुमार गुप्ता तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
08 Feb 2025 12:04 PM (IST)
नवी दिल्ली विधानसभा जागेवरील मतमोजणीच्या ११ व्या फेरीनंतर, अरविंद केजरीवाल यांना एकूण १८०९७ मते मिळाली. भाजपचे प्रवेश वर्मा यांना आतापर्यंत १९२६७ मते मिळाली आहेत. म्हणजेच अरविंद केजरीवाल ११७० मतांनी मागे आहेत.
08 Feb 2025 11:52 AM (IST)
कालकाजी विधानसभा क्षेत्रात आघाडीवर असलेल्या भाजप उमेदवार रमेश बिधूडी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, "मी कालकाजीच्या जनतेचे मनःपूर्वक आभार मानतो. ही आघाडी कालकाजीच्या जनतेची आहे. गेल्या 10 वर्षांत कालकाजीच्या नागरिकांनी खूप त्रास सहन केला, कारण या भागात कोणतेही विकासकाम झाले नाही..."
#WATCH | On leading in the Kalkaji assembly constituency, BJP candidate Ramesh Bidhuri says, "I thank the people of Kalkaji. This lead is of the people of Kalkaji. In the last 10 years, the people of Kalkaji wept tears of blood because no development work was done in the… pic.twitter.com/iKI8E7wcT3
— ANI (@ANI) February 8, 2025
08 Feb 2025 11:49 AM (IST)
कालकाजी मतदारसंघातून मुख्यमंत्री आतिशी ३२०० पेक्षा जास्त मतांनी मागे आहेत. मुस्तफाबाद मतदारसंघात मोहन सिंह बिश्त ४० हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.
08 Feb 2025 11:45 AM (IST)
दिल्ली निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये आम आदमी पार्टी मागे पडताना दिसत आहे. अण्णा हजारे यांनी याबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, "अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील लोकांना आश्वासन द्यायला हवे होते की ते त्यांच्यासाठी काम करतील. मी त्यांना वारंवार सांगत राहिलो, पण ते त्यांच्या मनात कधीच आले नाही. त्यांनी दारूच्या दुकानांचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी दारूबद्दल का बोलले, कारण त्यांना पैसा आणि संपत्ती हवी होती. या दारूमुळे ते कुप्रसिद्ध झाले. यामुळे लोकांनाही संधी मिळाली."
08 Feb 2025 11:42 AM (IST)
जंगपुरा जागेवर मतमोजणीच्या पाच फेऱ्यांनंतर, मनीष सिसोदिया ३८६९ मतांनी आघाडीवर आहेत. मनीष सिसोदिया यांना आतापर्यंत एकूण १९२२२ मते मिळाली आहेत तर भाजपचे तरविंदर सिंग यांना १५३५३ मते मिळाली आहेत.
08 Feb 2025 11:32 AM (IST)
मिल्कीपूरमध्ये मतमोजणीच्या १० फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. भाजप उमेदवार चंद्रभानू पासवान आता २८५३० मतांनी पुढे आहेत. चंद्रभानू यांना ५३१९३ मते मिळाली तर सपाचे अजित प्रसाद यांना २४५८८ मते मिळाली.भाजप उमेदवार चंद्रभानू पासवान यांनी मोठ्या आघाडीवर म्हटले आहे की, आम्ही पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांचे आभार मानतो, ज्यांच्या सक्षम नेतृत्वामुळे मिल्कीपूरच्या लोकांनी प्रचंड पाठिंबा दिला. सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या धोरणांनी आणि कृतींनी प्रभावित होऊन, मिल्कीपूरच्या लोकांनी मतदान केले आहे.
08 Feb 2025 11:29 AM (IST)
दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालानुसार आतापर्यंत भाजपला 47.51 टक्के मते, आम आदमी पक्षाला 4.29 टक्के मते आणि काँग्रेसला सर्वात कमी 5.53 टक्के मते मिळाल्याची नोंद कऱण्यात आली आहे.
08 Feb 2025 11:13 AM (IST)
मतमोजणीच्या सातव्या फेरीनंतर, आम आदमी पक्षाचे दुर्गेश पाठक राजेंद्र नगर मतदारसंघातून आघाडीवर आहेत. भाजपचे उमंग बजाज २५०० पेक्षा जास्त मतांनी पिछाडीवर आहेत.
08 Feb 2025 11:07 AM (IST)
दिल्लीतील ट्रेंडमध्ये भाजप आघाडीवर आहे. दिल्ली सचिवालयातील उच्च अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यालयात पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारी कागदपत्रे आणि डेटा संरक्षित करण्यास सांगितले आहे.
08 Feb 2025 11:02 AM (IST)
ग्रेटर कैलाश मतदारसंघांत मतमोजणीच्या चौथ्या फेरीनंतर, भाजपच्या शिखा राय ४ हजारांहून अधिक मतांनी पुढे आहेत. आम आदमी पक्षाचे सौरभ भारद्वाज येथे सातत्याने आघाडी राखत होते, परंतु सध्या ते मागे पडले आहेत.
08 Feb 2025 10:58 AM (IST)
"ही साधारण निवडणूक नव्हती. ही एक चांगल्या आणि वाईटातील लढाई होती. ही गुंडागर्दीची लढाई होती. मला पूर्ण विश्वास आहे की पूर्ण दिल्लीचे नागरिक चांगल्या गोष्टींसाठी आणि आप पक्षासाठी उभे राहतील. मी पूर्वीच सांगितलं आहे की अरविंद केजरीवाल चौथ्यांदा मुख्यमंत्री बनणार. आज सायंकाळपर्यंत संपूर्ण निकाल समोर येईल," असे मत दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी व्यक्त केले.
08 Feb 2025 10:43 AM (IST)
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने आघाडी घेतली असून ‘आप’ पक्षाला मोठा धक्का बसताना दिसत आहे. मुस्लीमबहुल मतदारसंघातही भाजपाने आघाडी घेतली आहे. ओखला या मतदारसंघात आजवर भाजपाचा विजय झालेला नव्हता. याठिकाणी भाजपाचे मनीष चौधरी आघाडीवर आहेत. तर मुस्तफाबाद येथे भाजपाचे मोहन सिंह बिश्ट आघाडीवर आहेत. हा भाजपचा मोठा विजय मानला जात असून आपला धक्का बसला आहे.
08 Feb 2025 10:28 AM (IST)
दिल्लीत भाजपने आघाडी कायम ठेवली आहे. दरम्यान, भाजप समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे. भाजप ४२ जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पक्ष २८ जागांवर आघाडीवर आहे.
08 Feb 2025 10:11 AM (IST)
दिल्ली विधानसभेच्या जागेवर भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यात जोरदार लढत आहे. दुसऱ्या फेरीत आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांना २५४ मतांनी मागे टाकले आहे.
08 Feb 2025 10:05 AM (IST)
दिल्लीतील कालकाजी मतदारसंघाती भाजप उमेदवार रमेश बिधुडी 4238 मतांनी आघाडीवर असून आपच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना 3089मतांनी पिछाडीवर आहेत
08 Feb 2025 09:47 AM (IST)
निवडणूक आयोगाच्या मते, भाजप ३६ जागांवर आघाडीवर आहे, तर आप १६ जागांवर आघाडीवर आहे. ट्रेंडनुसार, भाजपने बहुमताचा आकडा ओलांडला आहे.
08 Feb 2025 09:38 AM (IST)
मुस्तफाबाद मतदारसंघातून एआयएमआयएमचे ताहिर हुसेन, आम आदमी पक्षाचे आदिल खान, काँग्रेसचे अली मेहंदी आणि भाजपचे मोहन सिंग बिष्ट निवडणूक लढवत आहेत. येथे भाजपचे उमेदवार मोहन बिष्ट सुमारे ५७०० मतांनी पुढे आहेत.
बल्लीमारन विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाकडून इम्रान हुसेन, काँग्रेसकडून हारून युसूफ आणि भाजपकडून कमल बंगाडी निवडणूक लढवत आहेत. भाजप येथे सुमारे २०० मतांनी आघाडीवर आहे.
मतिया महल विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाकडून आले मोहम्मद इक्बाल आणि काँग्रेसकडून माजी आमदार असीम मोहम्मद खान निवडणूक लढवत आहेत. दीप्ती इंदोरा भाजपकडून निवडणूक लढवत आहेत.
सीलमपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून अब्दुल रहमान आणि आम आदमी पक्षाकडून झुबेर अहमद निवडणूक लढवत आहेत, तर भाजपकडून नगरसेवक अनिल गौर निवडणूक लढवत आहेत. भाजपचे अनिल शर्मा सुमारे १३२५ मतांनी पुढे आहेत.
08 Feb 2025 09:34 AM (IST)
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार, भाजप 28 जागांवर आघाडीवर असून आम आदमी पार्टी ९ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
08 Feb 2025 09:21 AM (IST)
मिल्कीपूरमध्ये १४ ईव्हीएमची मतमोजणी पूर्ण, भाजपचे चंद्रभानू पासवान जवळपास ४ हजार मतांनी आघाडीवर आहेत. समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांनी मिल्कीपूर पोटनिवडणुकीवर सांगितले की, “मिल्कीपूरमध्ये मतमोजणी सुरू आहे. भाजपने बेईमानी करण्याचा विक्रम मोडला आहे. आम्ही संपूर्ण प्रकरण निवडणूक आयोगासमोर अनेक वेळा मांडले. निवडणुकीत आमच्या सर्व तक्रारी सिद्ध होत होत्या. भाजपचे गुंड बूथ काबीज करत होते. पण निवडणूक आयोगाने काहीही केले नाही. असे असूनही, भाजपचा पराभव होईल. सपा उमेदवार जिंकेल."
08 Feb 2025 09:12 AM (IST)
पहिल्या फेरी अंतर्गत अरविंद केजरीवाल 1500 मतानी पिछाडीवर असल्याचे दिसत आहे.
08 Feb 2025 09:10 AM (IST)
दिल्लीतील सर्व ७० जागांसाठीचे ट्रेंड समोर आले आहेत, ज्यामध्ये भाजपने ३९ जागांसह बहुमताचा आकडा ओलांडला आहे. त्याच वेळी, आम आदमी पार्टी २९ जागांवर आघाडीवर आहे. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, आतिशी हे मागे पडले आहेत. या जागांवर भाजप आघाडीवर आहे. काँग्रेस २ जागांवर आघाडीवर आहे.
08 Feb 2025 08:54 AM (IST)
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपने बहुमताचा आकडा ओलांडला आहे. ट्रेंडमध्ये भाजप ३९ जागांवर आघाडीवर आहे.
08 Feb 2025 08:44 AM (IST)
पोस्टल बॅलेटनंतर, आता EVM वरून मतमोजणी सुरू आहे. पोस्टल मतपत्रिकेनंतर ईव्हीएमवरून मतमोजणी सुरू झाली आहे. पोस्टल बॅलेटमध्ये भाजपने आम आदमी पार्टीवर सुरुवातीची आघाडी घेतली आहे. दिल्लीतील 70 पैकी भाजप 25 जागांवर आघाडीवर आहे, आप 11 आणि काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजप बहुमताच्या केवळ 11 जागांनी मागे आहे.
08 Feb 2025 08:07 AM (IST)
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली असून, मनीष सिसोदिया पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
08 Feb 2025 07:57 AM (IST)
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला काही मिनिटांत सुरुवात होणार आहे. दरम्यान, ज्या ठिकामी ईव्हीएम ठेवण्यात आले आहेत, त्या ठिकाणीही पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तीन लेअरमध्ये सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे.
08 Feb 2025 07:45 AM (IST)
नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री देणारा मतदारसंघ मानला जातो. कारण यापूर्वी येथे भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. 1993 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे कीर्ती आझाद यांनी विजय मिळवून दिल्लीमध्ये भाजपचे सरकार स्थापन केले. त्यामुळे या मतदानाला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे.
08 Feb 2025 07:36 AM (IST)
ग्रेटर कैलास मतदारसंघातील आपचे उमेदवार सौरभ भारद्वाज यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. 'आम आदमी पक्षाला सत्तेपासून दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. मात्र, जनतेचे आशीर्वाद 'आप'वर आहेत. मला विश्वास आहे की, जनता अरविंद केजरीवाल यांना चौथ्यांदा मुख्यमंत्री बनवणार आहे. काही दिवसांत ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील'.
08 Feb 2025 07:13 AM (IST)
ज्या ठिकाणी ईव्हीएम ठेवण्यात आले आहेत, त्या ठिकाणीही पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तीन लेअरमध्ये सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आर. एलिस वाज यांनी सांगितले आहे.
08 Feb 2025 07:08 AM (IST)
दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुस्लिमबहुल मानल्या जाणाऱ्या सुमारे 22 जागांवर आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचे लक्ष लागले आहे. यापैकी सीलमपूर, मुस्तफाबाद, मतिया महल, बल्लीमारन आणि ओखला या जागांवर मुस्लिम उमेदवार अनेकदा निवडणूक जिंकत आले आहेत. याशिवाय बाबरपूर, गांधीनगर, सीमापुरी, चांदनी चौक, सदर बाजार, किरारी, जंगपुरा आणि करावल नगर अशा 18 जागा आहेत जिथे मुस्लिम लोकसंख्या 10 ते 40 टक्के मानली जाते. या भागात मुस्लिम समाजाचे मतदार निर्णायक भूमिका बजावत आहेत.
08 Feb 2025 06:56 AM (IST)
जंगपुरा विधानसभा मतदारसंघातील आपचे उमेदवार मनीष सिसोदिया यांनी मतमोजणीपूर्वीच विजयाचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, 'आम्हाला विश्वास आहे की (आप) सरकार स्थापन होईल. दिल्ली आणि तिथल्या मुलांच्या शिक्षणासाठी आपल्याला अजून खूप काम करायचं आहे'.
08 Feb 2025 06:51 AM (IST)
दिल्ली मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतमोजणीसाठी 11 जिल्ह्यांमध्ये 19 मतमोजणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत, जिथे सकाळी 8 वाजल्यापासून थेट मतमोजणी पाहता येईल. उत्तर दिल्लीच्या 8 विधानसभांसाठी 2 मतमोजणी केंद्रे, ईशान्येकडील 5 विधानसभांसाठी 2 आणि नवी दिल्लीच्या 6 विधानसभांच्या मतमोजणीसाठी 3 मतमोजणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
08 Feb 2025 06:43 AM (IST)
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील सर्व 70 जागांसाठी शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. येत्या पाच वर्षांत दिल्ली कोणाच्या ताब्यात राहणार हे चित्र दुपारी बारा वाजेपर्यंत स्पष्ट होऊ शकते. बहुतांश एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्षाची पिछेहाट झाल्याचे दिसून आले असून, भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
08 Feb 2025 06:33 AM (IST)
मतमोजणीसाठी ५००० अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) अॅलिस वाझ यांनी सांगितले की, शनिवारी मतमोजणीसाठी मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक आणि प्रक्रियेसाठी प्रशिक्षित सहाय्यक कर्मचाऱ्यांसह एकूण ५,००० कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मतमोजणी प्रक्रियेची निष्पक्षता लक्षात घेऊन, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ५ व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल्स) यादृच्छिकपणे निवडले जातील.
08 Feb 2025 06:29 AM (IST)
या दिल्ली निवडणुकीत मध्यमवर्गीयांचे मत खूप महत्त्वाचे आहे. इंडियन एक्सप्रेसमधील एका वृत्तानुसार, 'आप'ने हे मान्य केले आहे की त्यांना फक्त 'गरिबांचा पक्ष' म्हणून पाहिले जाते, म्हणूनच त्यांनी मध्यमवर्गीयांना आकर्षित करण्यासाठी २०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अनेक मागण्यांसह 'मध्यमवर्गीय जाहीरनामा' सुरू केला आहे. तथापि, भाजप मध्यमवर्गावरही लक्ष ठेवून आहे.
08 Feb 2025 06:25 AM (IST)
१९९३ मध्ये, भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत पहिला आणि एकमेव विजय मिळवला. त्यावेळी त्यांचा मतदानाचा वाटा ३०-४० टक्क्यांच्या दरम्यान होता. यानंतर, १९९८ ते २००८ पर्यंत भाजप काँग्रेसच्या मागे राहिला, त्यानंतर २०१३ मध्ये त्रिशंकू विधानसभेत तो सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, परंतु सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरला. यानंतर, २०१५ आणि २०२० मध्ये ते 'आप'पेक्षा मागे पडले.
08 Feb 2025 06:22 AM (IST)
दिल्ली निवडणूक २०२५ ची मतमोजणी ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे, त्यामुळे मतमोजणी केंद्रावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अक्षरधाम मंदिराजवळील कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेज, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील मतमोजणी केंद्राचे फोटो.
#WATCH | Delhi | Security heightened at the counting centre as the counting of votes for #DelhiAssemblyElection2025 will be conducted on 8th February. Visuals from a counting centre in Commonwealth Games Village, Sports Complex near Akshardham Temple pic.twitter.com/vvGGyFpTJx
— ANI (@ANI) February 7, 2025
08 Feb 2025 06:20 AM (IST)
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांबद्दल सर्व राजकीय पक्षांमध्ये खूप उत्सुकता आहे. दिल्लीतील ७० विधानसभा जागांसाठी एकूण ६९९ उमेदवारांचे भवितव्य सध्या ईव्हीएममध्ये अडकले आहे. मुख्य स्पर्धा सत्ताधारी आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांच्यात आहे. या निवडणुकीत एकूण ६९९ उमेदवारांपैकी फक्त ७० नेते आमदार बनून विधानसभेत पोहोचू शकतील.
08 Feb 2025 06:17 AM (IST)
दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान, सर्वांच्या नजरा येथील दोन प्रमुख जागांवर आहेत. पहिली जागा नवी दिल्लीची आहे, जिथे अरविंद केजरीवाल भाजपचे परवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांच्याविरुद्ध उभे आहेत. दुसरीकडे, कालकाजी मतदारसंघात, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी काँग्रेसच्या अलका लांबा आणि भाजपचे रमेश बिधुरी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत आहेत.
08 Feb 2025 06:13 AM (IST)
५ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील ७० विधानसभा जागांसाठी मतदान झाल्यानंतर, अनेक वाहिन्यांनी त्यांचे एक्झिट पोल प्रसिद्ध केले, ज्यात राजधानीत मोठ्या बदलांचे संकेत दिसून आले. बहुतेक एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्षाला सत्ता गमवावी लागली. हे पाहता, दिल्लीत भाजप आणि आप यांच्यात निकराची लढत होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. जर पुन्हा एकदा त्रिशंकू विधानसभा निर्माण झाली तर काँग्रेस आणि अपक्ष आमदारांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.
08 Feb 2025 06:10 AM (IST)
आता देशावर त्याचा काय परिणाम होईल याबद्दल बोलूया? सर्वप्रथम, भाजपच्या विजयाच्या बाबतीत, आम आदमी पक्ष काँग्रेसला दोष देऊ शकतो आणि काँग्रेसमुळेच त्यांचा पराभव झाल्याचे उघड करू शकतो. निवडणुकीपूर्वीच अरविंद केजरीवाल यांनी इंडिया ब्लॉकमधून काँग्रेसला बाहेर काढण्याची धमकी दिली आहे आणि अरविंद केजरीवाल यांना काँग्रेस वगळता इंडिया ब्लॉकच्या सर्व पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. अशा परिस्थितीत, दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यानही काँग्रेस एकटी होती आणि निवडणुकीनंतरही ती एकटी असल्याचे दिसून येते.
08 Feb 2025 06:04 AM (IST)
आता, जर दिल्लीतही विजय मिळाला, तर ती भाजपसाठी हॅट्रिक असेल, म्हणजेच सलग तीन निवडणुका जिंकणारा पक्ष असेल आणि काँग्रेस सलग तीन निवडणुका हरणारा पक्ष असेल. त्याच वेळी, दिल्लीत पराभवाचा सामना करणारा 'आप' पहिला पक्ष बनेल.
08 Feb 2025 06:01 AM (IST)
जर भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला, जसे एक्झिट पोल दर्शवत आहेत, तर पक्ष आणि कार्यकर्त्यांचे मनोबल सातव्या आकाशाला भिडेल. गेल्या वर्षी २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगली कामगिरी करता आली नाही, परंतु त्यानंतर हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी ऐतिहासिक राहिली आहे.