फोटो सौजन्य - सोशल मीडिया
दिल्ली : देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत. तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन झाले असून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी एनडीएकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरले आहेत. भाजपला 400 पारचा आकडा गाठता आलेला नसला तरी देखील मित्रपक्षाच्या बहुमतांच्या जोरावर एनडीएने सरकार स्थापन झाले आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले असून भाजपकडून त्यांच्या चेहरा पुढे केला जातो. मात्र नरेंद्र मोदी हे पुढच्या लोकसभेला अर्थात 2027 ला हे राष्ट्रपती पदाचे उमेदवार ठरु शकतात, अशी शक्यता माजी खासदार कुमार केतकर यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘संसदेत गर्जतो शिवनेरीचा छावा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर बोलत होते. कुमार केतकर हे काँग्रेसचे खासदार आहेत. या कार्यक्रमावेळी कुमार केतकर यांनी हा दावा केला. तसेच कुमार केतकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोनच इच्छा आहेत. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास नरेंद्र मोदी यांना हिंदु राष्ट्रामध्ये फारसा रस नाही. हिंदु राष्ट्र हवा आहे, पण हिंदु राष्ट्राची नैपत्य रचना करायची. मात्र, नरेंद्र मोदींचा जीव हा फक्त सत्तेमध्ये अडकलेला आहे. ते सत्तेत राहण्यासाठी ते जे शक्य असेल ते करतात. मग राजकीय पक्ष फोडण्यापासून सर्वच”, अशी टीका माजी खासदार कुमार केतकर यांनी केली.
कुमार केतकर काय म्हणाले?
“देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ 2027 ला संपेल. मला असं वाटतं त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणतील की आता मी राष्ट्रपती होतो. माझी राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी आहे. मग जर खरोखर ते थोड्याशा मताने निवडून आले आणि राष्ट्रपती झाले. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मत मोजण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळे थोड्याशा मताने समजा ते निवडून आले आणि 2027 ला नरेंद्र मोदी राष्ट्रपती झाले. त्यानंतर ते 2032 पर्यंत राष्ट्रपती असतील. मग 2029 च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीत अगदी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाची जरी सत्ता आली तरी नरेंद्र मोदी राष्ट्रपती असतील. त्यामुळे ते काहीही करु शकणार नाहीत. कारण नरेंद्र मोदी राष्ट्रपती असतील. राष्ट्रपती प्रत्येक गोष्ट तुम्हाला आडऊ शकतात”, असं माजी खासदार कुमार केतकर यांनी म्हटलं आहे.