आधी पोटनिवडणूक, मग पंजाबमध्ये केजरीवालांचा मास्टरप्लान
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. अवघ्या एका महिन्यांवर निवडणुकीचा रणसंग्राम आला आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबर मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. राज्यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी प्रमुख लढत आहे. बंड़ाचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे जोरदार राजकारण रंगले आहे. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन अजुनही नाराजीनाट्य सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम आदमी पार्टीची एन्ट्री झाली आहे.
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट व कॉंग्रेस पक्षाची मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. मात्र त्यांच्यामध्ये अवघ्या काही जागांवरुन मतभेद निर्माण झालेले आहेत. आता महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आपचे प्रमुख नेते व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे येणार आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी सुद्धा अरविंद केजरीवाल हे राज्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये सुद्धा अरविंद केजरीवाल हे राज्यामध्ये येणार आहेत.
हे देखील वाचा : जरांगे पाटलांच्या समर्थकांनी अडवला भाजपचा उमेदवार; रस्त्यात थांबून केली घोषणाबाजी
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी इंडिया आघाडीमध्ये सामील झाली होती. त्यावेळी आपने देखील सहभाग घेतला होता. त्यामुळे ही युती लोकसभेमध्ये प्रचार करत होते. आता विधानसभा निवडणुकीसाठी मविआच्या नेत्यांच्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल येणार आहेत. अरविंद केजरीवाल हे शरद पवार गट व ठाकरे गटासाठी प्रचार करणार आहेत. त्यांच्या गटातील उमेदवारांसाठी स्वतः प्रचारसभा घेणार आहेत. मात्र झारखंड निवडणुकीमध्ये कॉंग्रेस व आपच्या उमेदवारांमध्ये लढत झाली होती. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेमध्ये अरविंद केजरीवाल हे कॉंग्रेस उमेदवारांसाठी प्रचार करणार का याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.
झारखंड विधानसभेसाठी प्रचार
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे महाराष्ट्राबरोबरच झारखंडमध्ये सुद्धा प्रचार करणार आहेत. झारखंड मुक्ती मोर्चामध्ये सहभागी होत केजरीवाल प्रचार करणार आहेत. झारखंड विधानसभेसाठी सुद्धा अरविंद केजरीवाल हे इंडिया आघाडीच्या घटक पक्षासाठी प्रचार करणार आहेत.