उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 'माळेगाव'च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल; सर्वत्र एकच खळबळ (फोटो - सोशल मीडिया)
बारामती : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपली आहे. पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने मिळवलेल्या घवघवीत यशामुळे राज्यभरामध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांनी लाखोंच्या मतांनी विजय मिळवला आहे. अजित पवारांच्या या मोठ्या यशानंतर आता त्यांच्याच पक्षातील अमोल मिटकरी यांनी शरद पवार गटातील नेत्याला थेट चॅलेंज दिले आहे.
लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये देखील बारामतीमध्ये सर्व देशभरातून लक्ष लागले होते. बारामतीमध्ये पवार कुटुंबामध्येच लढत होती. अजित पवार यांच्याविरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना शरद पवार गटाने उमेदवारी दिली होती. या प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये अजित पवार यांनी बाजी मारली. आणि लाखो मतांच्या आघाडीने बारामती ही आपलीच असल्याचे स्पष्ट केले. अजित पवारांच्या या यशामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करत साजरा केला. यामुळे आता अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी व शरद पवार गटाचे विजयी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये पैज लागली होती. याची अमोल मिटकरी यांनी त्यांना सोशल मीडियावर पोस्ट करुन पुन्हा एकदा आठवण करुन दिली आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
निवडणुकीच्यापूर्वी अमोल मिटकरी व जितेंद्र आव्हाज यांच्यामध्ये पैज लागली होती. अजित पवार हे जर बारामती मतदारसंघामध्ये हारले तर मी आयुष्यभर जितेंद्र आव्हाड यांचा गुलाम म्हणून कळवा मुंब्रात काम करेल मात्र, अजित पवार निवडून आले तर जितेंद्र आव्हाड यांनी रोज सकाळी 8 वाजता वर्षा बंगल्यावर पाणी भरायला यायचं असे थेट चॅलेंज अमोल मिटकरी यांनी दिले होते. तसेच जर अजित पवार हे लाखो मतांच्या फरकाने विजयी झाले तर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या घरी घरगडी म्हणून राहावे आणि अजित पवार पराभूत झाले तर मी आव्हाडांच्या घरी घरगडी म्हणून कामाला जाईल’, असं खुलं चॅलेंज अमोल मिटकरींनी दिलं होतं. यानंतर आता अजित पवार हे बारामतीमध्ये लाखो मतांच्या फरकाने जिंकून आले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
निकालानंतर अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन पुन्हा एकदा शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना डिवचले आहे. पैजेची आठवण त्यांनी यापोस्टमध्ये करुन दिली आहे. अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहिले आहे की, डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी काल चॅलेंज दिलं होतं ते आज त्यांनी पूर्ण करावं! बारामती दादांचीच हे सिद्ध झाले आहे. प्रमाणपत्र घेतल्यावर सरळ बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा आणि चॅलेंज पूर्ण करावे.., असा घणाघात अमोल मिटकरी यांनी केला आहे. त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना सोशल मीडियावर टॅग देखील केले आहे. आता यावर शरद पवार गटाचे विजयी आमदार जितेंद्र आव्हाड काय प्रत्युत्तर देणार याची उत्सुकता लागली आहे.
डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी काल चॅलेंज दिलं होतं ते आज त्यांनी पूर्ण करावं! बारामती दादांचीच हे सिद्ध झाले आहे. प्रमाणपत्र घेतल्यावर सरळ बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा आणि चॅलेंज पूर्ण करावे..@Awhadspeaks
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 23, 2024