File Photo : Butte Patil
राजगुरूनगर : ‘दिलीप मोहिते पाटील यांच्या रूपाने तालुक्याला मंत्रिपदाची संधी चालून आलेली आहे. त्या संधीचे सोने करण्यासाठी सर्व मतदारांनी त्यांना पुन्हा निवडून देऊन संधी द्यावी. दिलीप मोहिते पाटील यांना तालुक्यासाठी काम करायचे आहे. स्वतः साठी काही करायचे नाही. मात्र, आज ज्यांना आमदार व्हायचे आहे, त्यांना आमदार होऊन पैसे कमवायचे आहेत. तालुक्यासाठी काहीही करायचे नाही’, असे पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष शरद बुट्टेपाटील यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : ‘ज्यांनी विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक केली, त्यांना जागा दाखवणार’; समाधान आवताडे यांचा निर्धार
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनामा प्रकाशित करण्याच्या निमित्ताने चाकण (ता.खेड) येथील आरती हॉटेल येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ऑनलाईन पद्धतीने बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार बोलताना म्हणाले की, ‘प्रांत अध्यक्ष सुनिल तटकरे प्रत्येक मतदारसंघात आम्ही पुढील पाच वर्षात काय करणार आहोत. याची महिती त्या जाहीरनाम्यात असणार आहे. पहिल्या 50 मतदारसंघातील जाहीरनामे प्रसिद्ध केले जाणार आहेत. त्यानंतर उर्वरित मतदारसंघातील जाहीरनामे प्रसिद्ध केले जाणार आहे’.
शरद बुट्टेपाटील म्हणाले की, ‘कामाचा अनुभव असणारे लोकप्रनिधीच दरवर्षीप्रमाणे आपल्या कामाचा अहवाल तसेच जाहीरनामा प्रसिद्ध करतात. त्यांच्याकडे पुढील पाच वर्षाचे नियोजन असते. विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला की, मेडिकल कॉलेज तालुक्यात सुरु करणार आहे. पण त्यांनां यासंबंधी असणारे नियमअटी माहीत नाहीत. जिल्ह्यात मेडिकल कॉलेज सुरु करण्यासाठी केंद्रशासनाने काही नियम/अटी ठरवून दिलेले आहेत’.
दिलीप मोहिते पाटील यांच्या रूपाने तालुक्याला मंत्रिपदाची संधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरसभेत बोलताना सांगितले की, दिलीप मोहिते पाटील यांना तुम्ही निवडून द्या, मी त्यांना मंत्री करतो. कोणताही नेता असं कधीच म्हणत नाही की मी नवीन उमेदवाराला मंत्री करतो. दिलीप मोहिते पाटील यांच्या रूपाने तालुक्याला मंत्रिपदाची संधी चालून आलेली आहे. त्या संधीचे सोने करण्यासाठी सर्व मतदारांनी त्यांना पुन्हा निवडूण देऊन संधी द्यावी. दिलीप मोहिते पाटील यांना तालुक्यासाठी काम करायचे आहे. स्वतःसाठी काही करायचे नाही. आज ज्यांना आमदार व्हायचे आहे त्यांना आमदार होऊन पैसे कमवायचे आहेत. तालुक्यासाठी काहीही करायचे नाही.
माझ्या मतदारसंघाच्या भावी वाटचालीकरता जाहीरनामा
महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील बोलताना म्हणाले की, माझ्या मतदारसंघाच्या भावी वाटचालीकरता जाहीरनामा प्रकाशित करताना या अगोदर राज्याचा पक्षाचा जाहिरनामा पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. निवडणूक लढवत असताना जाहीरनामे प्रसिद्ध केले जातात.
हेदेखील वाचा : “गेल्या १५ वर्षात कसलाच विकास न केल्यामुळे…”; गावभेटीदरम्यान समाधान आवताडेंची भालकेंवर टीका