विधानसभा निवडणुकीमुळे आयोगाकडून बॅग तपासणी केली जात असल्यामुळे नेते नाराज आहेत. (फोटो - टीम नवराष्ट्र)
पुणे : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. मागील महिन्यांमध्ये निवडणूक आयोगाकडून निवडणूक जाहीर करण्यात आली. तेव्हापासून राज्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीमधील वाईट प्रचार रोखण्यासाठी आयोगाकडून कसून चौकशी व नाकेबंदी करण्यात येत आहे. जागोजागी चेक पोस्ट उभारुन बॅंगांची व गाड्यांची पाहणी केली जात आहे. यापासून राजकीय नेत्यांची देखील सुटका झालेली नाही. उद्धव ठाकरे यांच्या बॅंगा तपासल्यामुळे आता सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा वादंग निर्माण झाला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अवघा एक महिना बाकी राहिला असल्यामुळे निवडणूक आयोग ॲक्शनमोडमध्ये आला आहे. यवतमाळ वणी येथे महाविकास आघाडीची प्रचारसभा पार पडली. उद्धव ठाकरे हे या सभेसाठी हेलिकॉप्टरमधून आले. हेलिपॅडवर उतरताच उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. याचा व्हिडिओ देखील शेअर करण्यात आली. तसेच उद्धव ठाकरे यांनी बॅग तपासण्यात आल्यामुळे रोष देखील व्यक्त केला. त्यामुळे यावर जोरदार राजकारण रंगले आहे. विरोधकांनी यावर नाराजी तर सत्ताधाऱ्यांनी निवडणूक आयोग त्यांचे काम करत असल्याची भूमिका व्यक्त केली.
बॅगा काय तपासता आमचं हृदय फाडून पाहिलंत तरी,
आत एकच गोष्ट सापडेल!
महाराष्ट्रधर्म! pic.twitter.com/uthlOHuRRF— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 11, 2024
हे देखील वाचा : “उद्धव ठाकरेंकडून बाण गेला आणि फक्त खान…; राज ठाकरेंची बोचरी टीका
उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्यात आल्यामुळे उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, बॅगा काय तपासता आमचं हृदय फाडून पाहिलंत तरी, आत एकच गोष्ट सापडेल!…महाराष्ट्रधर्म! असे उद्धव ठाकरे यांनी लिहिले होते. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शरद पवार गटाचे नेते व खासदार अमोल कोल्हे यांचा देखील बॅगा तपासण्यात आल्या. व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हे यांनी लिहिले की, आज पुन्हा बॅग तपासली गेली, विधानसभा निवडणुकीदरम्यान दुसऱ्यांदा तपासणी झाली. आजच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचीही तपासणी झाली. नियम असतात हे मान्य आहे, पण नियम फक्त विरोधी पक्षांनाच असतात अन् सत्ताधाऱ्यांना सगळीकडे मोकळं रान असतं हे मान्य नाही. कायदा आहे, तर तो समानच असला पाहिजे ! असे मत अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.
आज पुन्हा बॅग तपासली गेली, विधानसभा निवडणुकीदरम्यान दुसऱ्यांदा तपासणी झाली. आजच शिवसेना पक्षप्रमुख श्री. उध्दव ठाकरे साहेबांचीही तपासणी झाली.
नियम असतात हे मान्य आहे, पण नियम फक्त विरोधी पक्षांनाच असतात अन् सत्ताधाऱ्यांना सगळीकडे मोकळं रान असतं हे मान्य नाही. कायदा आहे, तर तो… pic.twitter.com/BK48pCmJel— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) November 11, 2024
यावरुन जेष्ठ नेते शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. शरद पवार यांनी विरोधकांच्या बॅगा तपासण्यावरुन नाराजी व्यक्त केली. शरद पवार म्हणाले की, सत्तेचा वापर कसा करायचा आणि विरोधकांना त्रास देणे त्यांनी ठरवलेला आहे. सत्ताधाऱ्यांचे एकंदरीत हाच दृष्टिकोन आहे त्यामुळे हे सहन करावा लागेल. त्याबद्दलची नाराजी व्यक्त करणे आवश्यक आहे. विरोधकांना अशा पद्धतीची वर्तणूक दिली जाते. याचा काय निवडणूक फार मोठा परिणाम होईल असा काही नाहीये, असे शरद पवार म्हणाले.
हे देखील वाचा : सलग 11 वेळा विजयाचा रेकॉर्ड; पण यावेळी ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार
तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांनी बॅगा तपासण्यामध्ये काहीही चुकीचे नसल्याचे सांगितले. अजित पवार म्हणाले की,लोकसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील बॅग तपासण्यात आली होती. तेव्हा माझ्या पण बॅगा तपासल्या आहेत. मी परभणीला असताना माझ्या बॅगा तपासल्या होत्या. निवडणूक आयोगाला पूर्ण बॅगा तपासण्याचा अधिकार आहे. . आमच्यासोबत पोलिसांच्या गाड्या असतील तर त्याही तपासल्या पाहिजेत, असे अजित पवार म्हणाले आहेत.