सोशल मीडियावर महाराष्ट्र कॉंग्रेसची खोटी यादी व्हायरल (फोटो - टीम नवराष्ट्र)
पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर केली आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल हाती येणार आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये आदर्श आचारसंहिता देखील लागू झाली आहे. त्यामुले सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. महायुतीसह महाविकास आघाडीमधील जागावाटप आणि उमेदवार शेवटच्या टप्प्यामध्ये आले असून आता कोणत्याही क्षणी उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. उमेदवारांची नावांची संभाव्य चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली असली तरी सोशल मीडियावर मात्र खोटी उमेदवार यादी पसरत आहे.
महाराष्ट्रासह सर्व नेत्यांना पक्षांना संधी दिलेल्या उमेदवारांबाबत उत्सुकता लागली आहे. मात्र आता सोशल मीडियावर फेक यादी प्रसिद्ध झाली आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसची ही यादी प्रसिद्ध झाली आहे. सोशल मीडियावर अनेक प्लॅटफॉर्मवर ही यादी प्रसिद्ध झाल्यामुळे तर्क वितर्कांना उधाण आले आहे. महाराष्ट्र कॉंग्रेसने ऑफिशियल अकाऊंटवरुन ही फिरत असलेली यादी खोटी असल्याचे सांगितले आहे.
हे देखील वाचा : विधानसभेसाठी मनसे ॲक्शनमोडवर!अमित ठाकरे ‘या’ मतदारसंघातून देणार लढत?
महाराष्ट्र कॉंग्रेसने सोशल मीडियावर व्हायरल झालेली यादीचा फोटो व्हायरल केला आहे. हे शेअर करताना कॉंग्रेसने लिहिले आहे की, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाने अजून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारांची कोणतीही यादी अधिकृतरीत्या जाहीर केलेली नाही. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. लवकरच योग्य त्या माध्यमांद्वारे आम्ही ती यादी जाहीर करू. असे मत महाराष्ट्र कॉंग्रेसने व्यक्त केले आहे. या यादीमध्ये 15 उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्र कॉंग्रेसमधील सर्व महत्त्वाचे नेत्यांची नावं आहेत. त्याचबरोबर कॉंग्रेसचा शिक्का असून जनरल सेक्रेटरी के. सी. वेनुगोपाल यांची सही देखील आहे.
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाने अजून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारांची कोणतीही यादी अधिकृतरीत्या जाहीर केलेली नाही. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका.लवकरच योग्य त्या माध्यमांद्वारे आम्ही ती यादी जाहीर करू.
भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी ने अभी तक… pic.twitter.com/JBOxJmTlIm
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) October 17, 2024
खोट्या यादीमध्ये कोणाची नावं?
सोशल मीडियावरील कॉंग्रेसच्या फेक यादीमध्ये असलेली नावे