एनटीआर-त्रिविक्रम श्रीनिवास पुन्हा एकत्र; भव्य पौराणिक सिनेमॅटिक स्पेक्टॅकलची अधिकृत घोषणा
यावेळी पिडिलाइट इंडस्ट्रीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष (कन्झ्युमर प्रॉडक्ट्स) कश्यप गाला म्हणाले, “फेविक्रिलमध्ये आम्ही भारतातील कलाकार आणि सर्जनशील समुदायाच्या विकासासाठी सातत्याने कटिबद्ध आहोत. ‘Artist in Me (AIM) 2026’ हा आमचा प्रमुख उपक्रम त्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आहे. या कार्यक्रमाद्वारे आमच्या उत्कृष्ट Fevicryl Certified Professionals यांना समकालीन कला प्रवाह, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष कार्यशाळांद्वारे अधिक सक्षम केले जाते.
आमच्या ‘Train-the-Trainer’ मॉडेलमुळे हे प्रशिक्षक पुढे समुदाय, शाळा आणि विविध शैक्षणिक संस्थांमधील हजारो कलाकारांपर्यंत हे ज्ञान पोहोचवतात. AIM हा केवळ प्रशिक्षण कार्यक्रम नसून, कलेबद्दलचे प्रेम साजरे करणारी, कला शिक्षणाला चालना देणारी, कला-उद्योजकतेला प्रोत्साहन देणारी आणि देशभरातील नव्या पिढीतील सर्जनशीलतेला प्रेरणा देणारी एक चळवळ आहे.”
AIM 2026 मध्ये यंदा Jong Ie Nara या दक्षिण कोरियातील अग्रगण्य शैक्षणिक साहित्य आणि प्रकाशन संस्थेसोबत आंतरराष्ट्रीय ज्ञान-विनिमय सत्राचेही आयोजन करण्यात आले. ही संस्था ओरिगामी आणि पेपर-फोल्डिंग शिक्षणासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे.
यंदाच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे लोकप्रिय डिजिटल कंटेंट क्रिएटर श्वेता महाडिक (DIY Chachi) यांचे विशेष मार्गदर्शन. DIY, अपसायकलिंग आणि क्राफ्ट-आधारित कंटेंटसाठी प्रसिद्ध असलेल्या श्वेता महाडिक सहभागी कलाकारांना DIY कंटेंटद्वारे प्रभावी डिजिटल उपस्थिती कशी निर्माण करावी आणि ती कशी विस्तारावी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमात उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी कलाकार आणि नामांकित इन्फ्लुएन्सर्स यांच्या सहभागातून खालील तीन प्रमुख विषयांवर सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे:






