(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
ट्रॉफीसह २० लाख रुपयांची बक्षीस रक्कम
ग्रँड फिनालेच्या शेवटच्या क्षणी मंचावर ज्योतीर्मयी नायक आणि तनिष्क शुक्ला उभे होते. सूत्रसंचालक आदित्य नारायण यांनी ज्योतीर्मयीचे नाव विजेती म्हणून जाहीर करताच ती भावूक झाली. ट्रॉफी आणि २० लाख रुपयांचा धनादेश स्वीकारल्यानंतर तिने भगवान जगन्नाथांचे स्मरण करत त्यांना वंदन केले. विजेतेपदाची घोषणा होताच तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
तनिष्क शुक्ला ठरला उपविजेता
या स्पर्धेत तनिष्क शुक्ला उपविजेता ठरला. त्याला १० लाख रुपयांची बक्षीस रक्कम प्रदान करण्यात आली. विजयानंतर ज्योतीर्मयीने हा किताब तिने संगीत थेरपीद्वारे मदत केलेल्या कर्करोगग्रस्त रुग्णांना समर्पित केला. संगीताच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचेही तिने सांगितले.
View this post on Instagram
अंतिम फेरीत या स्पर्धकांनी मिळवलं स्थान
‘इंडियन आयडॉल १६’चा हा सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. उत्कृष्ट प्रतिसादामुळे शोला दोन वेळा मुदतवाढही देण्यात आली होती. देशभरातील स्पर्धकांनी आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली. अंतिम फेरीत ज्योतीर्मयी नायक, तनिष्क शुक्ला, सुहेल सैफी, अंशिका चोंकर, मनराज, वीर सिंग आणि मायसिम बोसू यांनी स्थान मिळवले होते.
ग्रँड फिनालेला कुमार सानू, उषा उथुप, उर्मिला मातोंडकर आणि शहनाज गिल यांसारख्या मान्यवर कलाकारांनी उपस्थिती लावत अंतिम स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे, ज्योतीर्मयी नायक ही एक संगीत थेरपिस्ट (Music Therapist) असून, आपल्या आवाजाच्या माध्यमातून अनेक रुग्णांना मानसिक आधार आणि उपचार देण्याचे काम ती करत आहे.






