(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय अभिनेता, लेखक आणि सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडे सध्या त्याच्या ‘कुटुंब किर्रतन’ , नियम व अटी लागू या नाटकांमुळे चर्चेत आहे. या नाटकांच्या निमित्ताने तो महाराष्ट्रभर दौरे करत आहे. अनेकदा परदेशांतही या नाटकांचे प्रयोग होतात. नाटकाच्या प्रयोगांनतर अनेक प्रेक्षक कलाकरांच्या भेटीला येत असतात. भेट घेऊन आपल्या भावना शब्दातून व्यक्त करतात तर काही वेळा कलाकरांसाठी खास भेटवस्तू आणतात.
संकर्षण कराडे नेहमी सोशल मीडियावर काही खास आठवणी, किस्से शेअर करताना दिसतो. नुकताच अभिनेता संकर्षण कराडेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या शेअर केलेल्या पोस्टमध्ये कुटुंब कीर्रतन या नाटकाचा प्रयोग सुरू आहे. त्याचा मुलगा सर्वज्ञ आणि लेक स्त्रग्वी आईजवळ बसल्याचे दिसत आहे. सर्वज्ञ आईच्या मांडीवर नाटक पाहायला बसला आहे. जेव्हा संकर्षणची एन्ट्री होते, त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर उत्साह, डोळ्यांत आनंद पाहायला मिळतो. नाटकात बाबाची एन्ट्री होताच संकर्षणचा लेक आनंदाने टाळ्या वाजवतो. बाबाला पाहून सर्वज्ञचा चेहरा आनंदाने खुलतो. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
Hemant Dhome Poet: “गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप…” हेमंत ढोमेंची कविता सोशल मीडियावर व्हायरल
हा व्हिडीओ शेअर करताना संकर्षण कऱ्हाडेने लिहिले, “‘कुटुंब किर्रतन’च्या प्रयोगात बाबांची एन्ट्री झाल्यावर आम्हाला काय आनंद झालाय बघा. पोराच्या डोळ्यात बापाचं कौतुक… असंच कौतुकाने पाहण्याची संधी पुढे बापालाही मिळाली, की ‘बापाचा रोल जमला’ म्हणायचं. बापासाठी यापेक्षा मोठी कमाई काय असू शकते!”
संकर्षणच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव केला आहे. त्याच्या भावनिक शब्दांनी अनेकांना आपलेपणा जाणवला. “अगदी खरं लिहिलं आहे,” अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली. तर “तुझा मुलगा अगदी तुझी फोटोकॉपी आहे,”, “बापासारखाच मुलगा,” आणि “खरंच किती गोड आहे!” अशा कमेंट्सनी पोस्टचा कमेंट बॉक्स भरून गेला. एका चाहत्याने “किती बोलके डोळे आहेत… पुढे जाऊन नक्कीच मोठं नाव कमावेल,” असे म्हणत सर्वज्ञचे कौतुक केले.






