Share Market Today: गिफ्ट निफ्टीचे सकारात्मक संकेत; या 8 शेअर्सवर तज्ज्ञांचा फोकस, जाणून घ्या सविस्तर
शुक्रवारी, भारतीय शेअर बाजार सलग पाचव्या सत्रात घसरणीसह बंद झाला आणि बेंचमार्क निफ्टी ५० २३,८०० च्या पातळीखाली घसरला. सेन्सेक्स ३३१.६२ अंकांनी, म्हणजेच ०.४३ टक्क्यांनी घसरून ७६,०५९.७७ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १०२.१५ अंकांनी, म्हणजेच ०.४३ टक्क्यांनी घसरून २३,७६७.४५ वर स्थिरावला. (फोटो सौजन्य: Pinterest)
आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार भारत इलेक्ट्रॉनिक्स, कोल इंडिया, इंडस टॉवर्स, कॅनरा बँक, कोफोर्ज, टाटा पॉवर, एनटीपीसी, आयडीएफसी बँक, केफिन टेक्नॉलॉजीज, ओएनजीसी, बँक ऑफ बडोदा, वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज, बँक ऑफ इंडिया, आरईसी, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स येथील इक्विटी टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक, जिगर एस. पटेल यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी अदानी एंटरप्रायझेस, पीआय इंडस्ट्रीज, युनायटेड ब्रुअरीज (UBL) या तीन शेअर्सची शिफारस केली आहे.
चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांसाठी पाच ब्रेकआउट शेअर्सची शिफारस केली आहे. सुमीत बागडिया यांनी सिल्व्हर टच टेक्नॉलॉजीज, पीव्हीआर आयनॉक्स, नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्स, टीटीके हेल्थकेअर आणि आसाही सॉन्गवॉन कलर्स या शेअर्सची निवड केली आहे.
चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपालक्कल यांनी इंट्राडे ट्रेडिंगवेळी आज गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी सात स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये ॲस्ट्रल लिमिटेड, सीई इन्फो सिस्टीम्स लिमिटेड (मॅपमायइंडिया), डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड, सिटी युनियन बँक लिमिटेड, डीएलएफ लिमिटेड, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (बीएचईएल), आणि पीएनसी इन्फ्राटेक लिमिटेड यांचा समावेश आहे.






